सलमान खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, टायगर ३ ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ओपनिंद दिवसाइतकीच जवळपास कमाई केली आहे. सलमानच्या चित्रपटाने मंगळवारी ४२.५० कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच आतापर्यंत या चित्रपटाने तीन दिवसांत १४६.०० कोटींची कमाई केली आहे.
‘टायगर ३’ची जगभरातील कमाई
या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, दोन दिवसांत या सिनेमाने १७९.०५ कोटी रुपये कमावले, तर तीन दिवसांत २३० कोटींचा आकडा पार केला आहे.
तीन दिवसांतील कमाईच्या बाबतीत ‘जवान’ ‘टायगर ३’पेक्षा खूपच पुढे
निर्मात्यांनी हा चित्रपट लाँग वीकेंडला प्रदर्शित न करता दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय चुकीचा ठरला. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असता तर नक्कीच या चित्रपटाची कमाई बंपर झाली असती. या चित्रपटाची तुलना शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाशी केली तर तीन दिवसांचे आकडे खूप जास्त आहेत.
‘टायगर ३’चे कलेक्शन ६०.०६ कोटीं कमी
शाहरुख खानचा चित्रपट ‘जवान’ इतर चित्रपटांप्रमाणे शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि त्याने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ तीन दिवसांत २०६.०६ कोटी रुपयांची कमाई केली. त्या तुलनेत ‘टायगर ३’चे कलेक्शन ६०.०६ कोटी रुपयांनी कमी आहे. तर ‘जवान’ने अवघ्या तीन दिवसांत जगभरात ३८३.१९ कोटींची कमाई करून नवा विक्रम केला होतो.
पहिल्या मंगळवारी ‘टायगर ३’चे बंपर कलेक्शन
जर आपण ‘टायगर ३’ची तुलना ‘जवान’च्या पहिल्या मंगळवारच्या कमाईशी केली तर सलमानच्या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. ‘टायगर ३’ ने मंगळवारी ४२.५० कोटी रुपयांची कमाई केली, तर ‘जवान’ने मंगळवारी रिलीजच्या सहाव्या दिवशी केवळ २६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
सलमान खानच्या कारकिर्दीतील उत्तम चित्रपट
‘टायगर ३’मध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित, ‘टायगर ३’ हा यशराजच्या स्पाय युनिव्हर्स फ्रँचायझी चित्रपटांचा पाचवा भाग आहे. याआधी ‘टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’ आणि ‘पठाण’ रिलीज झाले आहेत. या पाचव्या चित्रपटाबद्दल सांगायचे तर, हा सलमान खानच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचे सिद्ध झाले आहे. हा सिनेमा बंपर कमाई करत आहे.
‘टायगर ३’ एकूण ८,९०० स्क्रीन्सवर रिलीज
‘टायगर ३’ यशराजच्या महागड्या चित्रपटांपैकी एक आहे, हा सिनेमा सुमारे ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनला. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट भारतात अंदाजे ५,५०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे, तर परदेशात ३,४०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. म्हणजेच ‘टायगर ३’ एकूण ८,९०० स्क्रीन्सवर आहे.