पदभरतीचा तपशील :
- प्राध्यापक पदासाठी १७ जागा, सहयोगी प्राध्यापक पदासाठी १२ जागा आणि सहायक प्राध्यापक पदासाठी ६ जागा ठेवण्यात आली आहेत.
- एकूण ३५ दांवर भरतीद्वारे नियुक्ती करण्यात येणार आहे.
- उमेदवारांना सूचना वाचल्यानंतरच फॉर्म भरण्याचा सल्ला दिला जातो.
- कारण चुकीचा भरलेला फॉर्म नाकारला जाईल.
- तसेच, चुकीची किंवा बनावट कागदपत्रे देखील स्वीकारली जाणार नाहीत. अशा उमेदवारांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते.
(वाचा : PW मध्ये कॉन्टेंट रिव्हयूवर पदावर नोकरीची संधी; ज्यूडिशिएरी कॉन्टेंटच्या पुनरावलोकनाचे काम)अर्ज शुल्काविषयी :
ओबीसी, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
इग्नू भरतीसाठी अर्ज करण्यासाठी :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर तुम्ही होम पेजवर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– यानंतर, इग्नू भरतीची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करा.
– यानंतर, फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर तुमची आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
– अंतिम सबमिट करा.
– यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
फॉर्म भरल्यानंतर या पत्त्यावर पाठवा :
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
संचालक, शैक्षणिक समन्वय विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, मैदान गढ़ी, नवी दिल्ली, ११००६८
(वाचा : DGHS Recruitment 2023: आरोग्य सेवा महासंचालनालयात ४८७ पदांसाठी भरती, मिळणार १ लाखापेक्षा जास्त पगार)