सोलापूरकरांसाठी सुवर्णसंधी! जिल्हाधिकारी कार्यालयात ‘या’ पदांसाठी भरती

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023: सोलापूरकरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर पदवीधर असाल तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची उत्तम संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे व्यवस्थापक, ग्रंथपाल, लिपिक- टायपिस्ट’ या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत जिल्हा प्रशासनाने अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाऊन घेऊया.

‘जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
व्यवस्थापक – ०१ जागा
ग्रंथपाल – ०१ जागा
लिपिक- टंकलेखक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ०३ जागा

शैक्षणिक पात्रता:
व्यवस्थापक – उमेदवार कोणत्याही शासकीय किंवा निम शासकीय शासन सेवेतून वर्ग-ब च्या पदावरून निवृत्त असावा.

ग्रंथपाल – शासन सेवा, शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक प्रशासन येथून ग्रंथपाल/ उपग्रंथपाल/ सहाय्यक ग्रंथपाल पदावरून सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे.

लिपिक/टंकलेखक – कोणत्याही विद्याशाखेतून पदवीधर. एमएस- सीआयटी आणि इंग्रजी (४०), मराठी (३०), हिंदी (३०/४०) टायपिंग येणे आवश्यक आहे.
(सर्व पदांवरील उमेदवारांना उर्दू भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.)

(वाचा: ANM Bharti Satara 2023: सातार्‍यात परिचारिकांसाठी भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)

वेतन:
व्यवस्थापक – ३५ हजार
ग्रंथपाल – २५ हजार
लिपिक- टंकलेखक – १५ हजार

नोकरी ठिकाण: सोलापूर

वयोमर्यादा: कमाल वय ७० वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (सामान्य शाखा), सोलापूर- ०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: IRCON Recruitment 2023: ‘इरकॉन इंटरनॅशनल’मध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

Jilhadhikari Karyalay Solapur Bharti 2023Jilhadhikari Karyalay Solapur Recruitment 2023जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर भरती २०२३सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयसोलापूर ताज्या बातम्यासोलापूर भरती
Comments (0)
Add Comment