मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्राध्यापक पदांची भरती; आजच करा अर्ज

BMC Nair Hospital Recruitment 2023: तुम्ही जर वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि अध्यापन क्षेत्रात करियर करायचे असेल तर मुंबईतील महानगरपालिकेच्या टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर रुग्णालय येथे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू आहे. नुकतीच या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध विषयांसाठीच्या एकूण १७ सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे.

यासाठी इछुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २२ नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर रुग्णालय सहाय्यक प्राध्यापक भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
एंडोक्राइनोलॉजी – ०१ जागा
रेडियोलॉजी – ०१ जागा
मायक्रोबायोलॉजी – ०१ जागा
गायनॅकोलॉजिस्ट – ०१ जागा
नेत्ररोगशास्त्र – ०२ जागा
बायोकेमिस्ट्री – ०२ जागा
भूलशास्त्र – ०९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या १७ जागा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून संबधित विषयात डीएम/डीएनबी/एमडी/एमएस असणे आवश्यक आहे आहे.

(वाचा: Pune Bank Bharti 2023: पदवीधर असाल तर आजच अर्ज करा; पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये लिपिक पदासाठी भरती)

वेतन:१ लाख रुपये मासिक

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा: किमाल ३८ वर्षे यामध्ये कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे.

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज शुल्क: ५८० रुपये आणि जीएसटी

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता: डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – ४००००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई महानगरपालिकेच्या’ अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजण्याच्या आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: LTMGH Hospital Bharti 2023: मुंबईच्या सायन हॉस्पिटल मध्ये ‘या’ पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

BMC Nair Hospital Bharti 2023BMC Nair Hospital Recruitment 2023नायर रुग्णालय भरती २०२३बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३मुंबई महानगरपालिका भरतीमुंबई महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment