‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ मध्ये मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

Mumbai Port Trust Bharti 2023: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ येथे नोकरीची संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. आता ही संधी चालून आली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट द्वारे वर्ग १ आणि वर्ग ३ मधील एकूण १४ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये सुरक्षा अधिकारी, कल्याण अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, हिंदी अनुवादक अशा अनेक पदांचा समावेश आहे.

या भरतीबाबत नुकतीच मुंबई पोर्ट ट्रस्टने अधिसूचना प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’मधील पदे आणि पदसंख्या:
सुरक्षा अधिकारी – ०३ जागा
कल्याण अधिकारी – ०१ जागा
वरिष्ठ कल्याण अधिकारी – ०३ जागा
Dy. व्यवस्थापक (कल्याण) – ०१ जागा
हिंदी अधिकारी – ०१ जागा
हिंदी अनुवादक – ०५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १४ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून संबधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

वेतन:
सुरक्षा अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार
कल्याण अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार
वरिष्ठ कल्याण अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार
Dy. व्यवस्थापक (कल्याण) – ६० हजार ते १ लाख ८० हजार
हिंदी अधिकारी – ५० हजार ते १ लाख ६० हजार
हिंदी अनुवादक – २९ हजार ६०० ते ८१ हजार १००

(वाचा: BMC Nair Hospital Recruitment 2023: मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती; आजच करा अर्ज)

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा:
सुरक्षा कार्यालय आणि कल्याण अधिकारी:- किमान २१ वर्ष आणि कमाल ३० वर्षे
वरिष्ठ कल्याण अधिकारी आणि हिंदी अधिकारी – किमान २१ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे
DYव्यवस्थापक (कल्याण) – किमान २१ वर्षे आणि कमाल ४० वर्षे
हिंदी अनुवादक – किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसाठी थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा: Pune Bank Bharti 2023: पदवीधर असाल तर आजच अर्ज करा; पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये लिपिक पदासाठी भरती)

Source link

Mumbai Port Trust Bharti 2023mumbai port trust jobsmumbai port trust latest vacancy 2023Mumbai Port Trust Recruitment 2023मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२३मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये भरती
Comments (0)
Add Comment