राज्याच्या उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती; तब्बल ७१७ जागांवर भरती

State Excise Department Job Vacancy : राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत मेगाभरती जाहीर झाली आहे. यामुळे, तरुण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान (राज्य उत्पादन शुल्क), जवान -नि- वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क) आणि चपराशी पदांच्या तब्बल एकूण ७१७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. १७ नोव्हेंबरपासून या ऑनलाइन अर्जाना श्रुवात होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२३ आहे.

पदभरतीचा तपशील :

विभाग : राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र शासन (State Excise Department, Government of Maharashtra)

भरले जाणारे पद :
लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी

पदनिहाय जागांची संख्या :

  • लघुलेखक (निम्नश्रेणी) Stenographer (Lower Grade) : ५ जागा
  • लघुटंकलेखक (Steno Typist) : १८ जागा
  • जवान-राज्य उत्पादन शुल्क (Jawan): ५६८ जागा
  • जवान -नि- वाहनचालक-राज्य उत्पादन शुल्क (Jawan cum Driver) : ७३ जागा
  • चपराशी (Peon) : ५३ जागा

एकूण रिक्त जागा : ७१७ पदे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

लघुलेखक (निम्नश्रेणी)
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

लघुटंकलेखक
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक

जवान ( राज्य उत्पादन शुल्क)
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

जवान -नि- वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क)
१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण
२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)

चपराशी
१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

(वाचा : DGHS Recruitment 2023: आरोग्य सेवा महासंचालनालयात ४८७ पदांसाठी भरती, मिळणार १ लाखापेक्षा जास्त पगार)

मिळणार एवढा पगार :

लघुलेखक (निम्नश्रेणी)
S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

लघुटंकलेखक
S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

जवान (राज्य उत्पादन शुल्क)
S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

जवान -नि- वाहनचालक (राज्य उत्पादन शुल्क)
S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

चपराशी
S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

ही कागदपत्रे आवश्यक :

1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
2. वयाचा पुरावा
3. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
4. नावात बदल झाल्याचा पुरावा
5. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
6. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
7. वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.

अशी केली जाणार निवड :

1. वरील पदांसाठी निवड प्रक्रिया वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. प्राप्त अर्जाची पात्रतेच्या निकषावर अर्जाची छाननी करून मुलाखतीसाठी पात्र / अपात्र उमेदवारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
3. पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
4. पात्र उमेदवारांनी मुलाखतीस येताना मूळ प्रमाणपत्रांसह उपस्थित रहायचे आहे. तसेच मुलाखतीची वेळ व दिनांक याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल, तसेच ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

परीक्षा शुल्काविषयी :

  • लघुलेखक (निम्नश्रेणी) :खुल्या प्रवर्गासाठी ९०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी ८१० रुपये
  • लघुटंकलेखक : खुल्या प्रवर्गासाठी ९०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी ८१० रुपये
  • जवान : खुल्या प्रवर्गासाठी ७३५ रुपये, राखीव प्रवर्गासाठी ६६० रुपये
  • जवान-नि-चालक : खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी ७२०रुपये
  • चपराशी : खुल्या प्रवर्गासाठी ८०० रुपये, राखीव प्रवर्गासाठी ७२० रुपये

महत्त्वाचे :

अर्ज सादर करण्याचा कालावधी : १७ नोव्हेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२३, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी : १७ नोव्हेंबर २०२३ ते १ डिसेंबर २०२३, सायंकाळी ५ वाजेपर्यंत

संकेतस्थळ : https://stateexcise.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती मिळेल.

सदर भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : BECIL Recruitment 2023: बीईसीआयएलमध्ये ११० पदांवर भरती; उमेदवारांनामधील कौशल्य चाचणी आणि मुलाखतीद्वारे होणार निवड)

Source link

Government jobstate excise departmentstate excise department recruitment 2023stateexcise.maharashtra.gov.inराज्य उत्पादन शुल्क विभागसरकारी नोकरी
Comments (0)
Add Comment