इंजिनिअर्स डिप्लोमा आणि डिग्री धारकांसाठी नोकरीची मोठी संधी; कोकण रेल्वेमधील जागांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Konkan Railway Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधत असणार्‍या आणि रेल्वेमध्ये नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे अंतर्गत पदवीधर शिकाऊ / तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदांच्या एकूण १९० रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ असून उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत सरकार
भरले जाणारे पद :
पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentices)
डिप्लोमा शिकाऊ (Diploma Apprentices)

एकूण भरल्या जाणार्‍या जागांची संख्या : ११९

पदनिहाय जागांचा तपशील :

पदवीधर अप्रेंटिस: ८० जागा
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : ३० जागा
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : ८० जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३

वयोमर्यादा : १८ ते २५ वर्षे

अर्ज शुल्काविषयी :

1. सामान्य/ओबीसी : १०० रुपये
2. [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला : कोणतीही फी नाही

मिळणार एवढा पगार :

कोकण रेल्वेतील अप्रेंटीसशीप अंतर्गत निवड होणार्‍या उमेदवारांना दरमहा ८ ते ९ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदवीधर अप्रेंटिस : Engineering degree in relevant discipline

टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : Diploma in Engineering in relevant discipline.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : BA /B.Com/ B.Sc /BBA /BMS/Journalism & Mass Communication / Bachelor of Business Studies

असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. एकापेक्षा जास्त ट्रेडमध्ये ITI पात्रता असलेले अर्जदार वेगवेगळ्या संबंधित ट्रेडसाठी स्वतंत्रपणे अर्ज करू शकतात.
5. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Source link

Konkan Railway Recruitment 2023railway bhartirailway jobsकोकण रेल्वे भरतीकोकण रेल्वे भरती २०२३
Comments (0)
Add Comment