ही भरती आयोगाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयासाठी होणार आहे. त्यानुसार या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज कसा करावा याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया.
‘कर्मचारी निवड आयोग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
यंग प्रोफेशनल (आयटी) : ०५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ०५ जागा
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली / आयोगाचे मुख्यालय
(वाचा: KKSU Nagpur Recruitment 2023: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; पगारही आहे भरपूर)
शैक्षणिक पात्रता: बीई/ बी-टेक/ बीसीए
वयोमर्यादा: कमाल ३२ वर्षे.
वेतन: ३० हजार रुपये मासिक आणि इतर भत्ते
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन आणि ऑनलाइन (ई-मेल द्वारे)
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १६ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ नोव्हेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत म्हणजेच अंदाजे ३० नोव्हेंबरच्या आधी अर्ज करावा.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता: अवर सचिव (आस्थापना-I), कर्मचारी निवड आयोग, कक्ष क्रमांक ७१२ ब्लॉक क्रमांक १२, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: sschq.e1@gmail.com
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कर्मचारी निवड आयोग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
(वाचा: Mumbai Port Trust Bharti 2023: ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’मध्ये मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)