ITBP Recruitment 2023: आयटीबीपीमध्ये २४८ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

ITBP Constable Recruitment 2023 : ITBP ने कॉन्स्टेबल / जनरल ड्युटीच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. या भरती मोहिमेसाठी गुणवंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार recruitment.itbpolice.nic.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) पदांची अधिसूचना १ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, ITBP पोलीस दलातील जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदाच्या २४८ जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २८ नोव्हेंबर पर्यंत अर्जासह ITBP कॉन्स्टेबल मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. उमेदवाराने अर्ज सबमिट करण्यापूर्वी भरतीविषयी सर्व माहिती वाचणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास.
  • क्रीडा कोट्याअंतर्गत, नोटीसमध्ये दिलेल्या कोणत्याही खेळात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.
  • राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळ खेळलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा :

सदर भारतीमध्ये अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय १८ ते २३ वर्षे दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

(वाचा : SBI Clerk Notification 2023 : एसबीआयमध्ये लिपिक पदाच्या भरतीची अधिसूचना जाहीर, तब्बल ८७७३ जागांवर नोकरीची संधी)

अर्ज शुल्काविषयी :

पुरुष अनारक्षित, OBC आणि EWS उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
तर, SC, ST प्रवर्गातील पुरुष उमेदवार आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी विनामूल्य असेल.

मिळणार एवढा पगार :

पे मॅट्रिक्स लेव्हल ३ नुसार, २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये पगार दिला जाईल.
ही रक्कम सातव्या CPC नुसार उपलब्ध असेल.

याप्रमाणे अर्ज करा:

  1. उमेदवार आयटीबीपीच्या www.itbpolice.nic.in किंवा recruitment.itbpolice.nic.in वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  2. भरती आणि पुढे ऑनलाइन अर्ज करा क्लिक करा.
  3. नवीन वापरकर्ता नोंदणी / लॉगिन निवडा.
  4. नवीन वापरकर्ते “नवीन वापरकर्ता नोंदणी” निवडा.
  5. नोंदणी पूर्ण करा आणि लॉगिन करा.
  6. नोंदणीकृत उमेदवार “लॉग इन” निवडा आणि थेट अर्ज भरा.
  7. उमेदवारांनी वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी.
  8. उमेदवार सर्व संबंधित योग्य तपशीलांसह ऑनलाइन फॉर्म भरतात.
  9. सर्व आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.
  10. सबमिशन करण्यापूर्वी ते सत्यापित करा.
  11. सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंटआउट घ्या.

(वाचा : ITPO Recruitment 2023: वाणिज्य मंत्रालय आयटीपीओ अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती; इंजिनिअर्ससाठी मोठी संधी)

Source link

itbpITBP Constable Recruitment 2023itbp recruitmentitbp recruitment 2023ITBP Recruitment 2023 Online Applicationआयटीबीपी नोकरी
Comments (0)
Add Comment