ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मोठी भरती; आजच करा अर्ज

NHM Thane Bharti 2023: ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत ही भरती होणार असून विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. यामध्ये फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ या पदांच्या एकूण ६३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच ठाणे महानगरपालिकेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती २८ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि मुलाखतीचे तपशील याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘ठाणे महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या:
फिजीशियन – ०९ जागा
स्त्रीरोग तज्ञ – ०९ जागा
बालरोग तज्ञ – ०९ जागा
नेत्ररोग तज्ञ – ०९ जागा
त्वचारोग तज्ञ – ०९ जागा
मानसोपचार तज्ञ – ०९ जागा
कान नाक घसा तज्ञ – ०९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६३ जागा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून संबधित विषयात एमडी/ डीएनबी/ एमएस/ एमडी असणे आवश्यक आहे. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: Career In DMLT: विज्ञान शाखेची आवड असेल तर ‘डीएमएलटी’ कोर्स आवर्जून करा; पगार आणि संधीही आहेत भरपूर)

वेतन:
फिजीशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ या पदांकरिता आठवड्यातून चार तासांची एक भेट. या एका भेटीचे ०२ हजार मानधन आणि प्रतीरुग्ण १०० रुपये असे वेतन दिले जाईल. जास्तीत जास्त ०५ हजार रुपये दिले जातील.

नेत्ररोग तज्ञ , त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ , कान नाक घसा तज्ञ या पदांकरिता १५ दिवसांतून चार तासांची एक भेट. या एका भेटीचे ०२ हजार मानधन आणि प्रतीरुग्ण १०० रुपये असे वेतन दिले जाईल. जास्तीत जास्त ०५ हजार रुपये दिले जातील.

नोकरी ठिकाण: ठाणे

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता: सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे

मुलाखतीची तारीख: २८ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. मुलाखत प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होतील. उमेदवारांनी मुलाखतीला येताना अधिसूचनेत नमूद केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि वेळेत उपस्थित राहावे.

(वाचा: ZP Satara Bharti 2023: योग प्रशिक्षकांसाठी सातारा जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

Source link

NHM Thane bharti 2023NHM Thane recruitment 2023Thane Mahanagarpalika Bharti 2023Thane Municipal Corporation Recruitment 2023ठाणे महानगरपालिका भरती २०२३ठाणे महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment