आता फक्त १ वर्षात पोस्ट ग्रॅज्युएशन, विद्यार्थी एकाच वेळी 2 शैक्षणिक अभ्यासक्रम करू शकणार

1 Year, 2 Degrees Decision By UGCआता पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना १ वर्षाचा पीजी कोर्स करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणजेच UGC च्या मते, आता नवीन पदव्युत्तर कार्यक्रम एकात्मिक कार्यक्रमांतर्गत एक वर्ष, दोन वर्षे किंवा पाच वर्षे अशा तीन फॉरमॅटमध्ये करता येणार आहे.

UGC चे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, “या नवीन फ्रेमवर्क नंतर, विद्यार्थी आता कोणत्याही स्ट्रीममध्ये मास्टर्स करू शकणार आहेत; मग, तो विषय अंडर-ग्रॅज्युएशन दरम्यान किरकोळ असो किंवा मोठा. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांना एका विषयाचा दीर्घकाळ अभ्यास करायचा नाही किंवा ज्यांना एकापेक्षा जास्त विषयांचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.”

आजच्या काळात विद्यार्थ्यांना बहुविद्याशाखीय ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही भौतिकशास्त्रातून ग्रॅज्युएशन केले असेल, पण त्यावेळी अर्थशास्त्र या विषयाचाही अभ्यास केला असेल. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत, तुम्हाला भौतिकशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन्ही विषयांमधून पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध असणार आहे.

(वाचा : Foreign Education: परदेशी शिक्षणाचे पर्याय अनेक; तुमचा परदेशी शिक्षणाचा मार्ग निवडण्यासाठी परिपूर्ण माहिती)

एक वर्षाचा पीजी कोर्स :

आता विद्यार्थ्यांना एक वर्ष पीजी करण्याचा पर्यायही असेल. १ वर्षाचा कोर्स केल्यानंतर, विद्यार्थी PG Diploma घेऊन कोर्स पूर्ण करू शकतात. पदव्युत्तर कार्यक्रमासाठी क्रेडिट फ्रेमवर्क आणि अभ्यासक्रमाला ३ नोव्हेंबर रोजी यूजीसीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ज्या विषयाचा त्यांनी पदवीपर्यंत अभ्यास केला नाही, त्या विषयासह विद्यार्थी पीजी करू शकतील. विद्यार्थ्यांना फक्त CUET PG परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. याशिवाय विद्यार्थी अभ्यासासाठी ऑफलाइन, ऑनलाइन किंवा हायब्रिड मोड निवडू शकतात.

अशी क्रेडिट फ्रेमवर्क पाळावी लागणार :

पीजी पदवीच्या विविध स्वरूपांसाठी, किमान क्रेडिट स्कोअर पात्रता UG स्तरावर पूर्ण करणे आवश्यक आहे. नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नुसार, उच्च शिक्षण लेव्हल ४.५ ते लेव्हल ८ पर्यंत विभागले गेले आहे. उदाहरणार्थ, १ वर्ष किंवा २ सेमिस्टर मास्टर्स प्रोग्रामसाठी, एखाद्याला ऑनर्स किंवा रिसर्चसह ऑनर्स ग्रॅज्युएशन आणि स्तर ६.५ किंव१ १६० क्रेडिट्स असणे आवश्यक आहे.

विद्यार्थी एकाच वेळी दोन अभ्यासक्रम करू शकणार :

यूजीसीच्या या नव्या फ्रेमवर्कनुसार आता विद्यार्थी एकाच वेळी दोन पूर्णवेळ शैक्षणिक कार्यक्रम करू शकतात. परंतु त्यांच्या वर्गाच्या वेळा एकमेकांशी साधर्म्य साधणार्‍या नसतील. जर एका अभ्यासक्रमाचे वर्ग पूर्णवेळ ऑफलाइन आयोजित केले जात असतील तर दुसऱ्या अभ्यासक्रमाचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने असावेत. याशिवाय, दोन्ही अभ्यासक्रमांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेता येतील.

(वाचा : Tips to Prepare a CEO : सीईओ होण्यासाठी स्वत:ला तयार करा, या Top टिप्स आहेत)

Source link

dual degreedual degree coursesug-pg college higher educationUGCugc newsugc ug-pg college higher educationयूजीसीयूजीसी गाइडलाइन्स
Comments (0)
Add Comment