दहावी पास उमेदवारांसाठी टाटा हॉस्पिटल मध्ये उत्तम पगाराची नोकरी; थेट मुलाखत पद्धतीने निवड

Tata Memorial Center ACTREC Recruitment 2023: ‘टाटा मेमोरियल सेंटर’ मुंबई येथे भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. टाटा हॉस्पिटलच्या खारघर येथील ‘एसीटीआरईसी’ केंद्रासाठी ही भरती सुरू आहे. या भरती ‘एमटीएस’ म्हणजेच मल्टी टास्किंग स्टाफची नियुक्ती केली जाणार आहे. नुकतीच याबाबत टाटा मेमोरियर सेंटरने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

रुग्णालयाच्या किचन आणि कॅफेटेरियासाठी हे पद भरले जाणार आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या पदांकरिता थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. या मुलाखती २१ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. तेव्हा या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया.

टाटा मेमोरियल सेंटर ‘एसीटीआरईसी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
एमटीएस/ MTS (स्वयंपाकघर/कॅफेटेरिया सेवा) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षन संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच संबधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा.

नोकरी ठिकाण: मुंबई/ खारघर

(वाचा: Career In DMLT: विज्ञान शाखेची आवड असेल तर ‘डीएमएलटी’ कोर्स आवर्जून करा; पगार आणि संधीही आहेत भरपूर)

वयोमर्यादा: कमाल वय ३५ वर्षे.

वेतन/ मानधन: १९ हजार ६०० ते २५ हजार रुपये (मासिक)

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

मुलाखतीची तारीख: २१ नोव्हेंबर २०२३

मुलाखतीचा पत्ता: दुसरा मजला, आर्काइव्हल ब्लॉक, टाटा मेमोरियल सेंटर ‘एसीटीआरईसी’, सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई- ४१०२१०.

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा मेमोरियल सेंटर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. मुलाखत प्रक्रिया २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल. उमेदवारांनी मुलाखतीला येताना अधिसूचनेत नमूद केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि वेळेत उपस्थित राहावे.

(वाचा : ZP Satara Bharti 2023: योग प्रशिक्षकांसाठी सातारा जिल्हा परिषदेत मोठी भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील )

Source link

ACTREC Bharti 2023actrec recruitment 2023TMC Mumbai Bharti 2023TMC Mumbai Recruitment 2023टाटा मेमोरिअल सेंटर भरती २०२३टाटा हॉस्पिटल भरती २०२३
Comments (0)
Add Comment