अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उमेदवारांच्या अर्जाची स्थिती AIIMS द्वारे ५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि पात्र उमेदवारांचे परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र १२ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केले जाईल. एम्स सामायिक भरती परीक्षा २०२३ ही १८ डिसेंबर आणि २० डिसेंबर २०२३ रोजी घेतली जाईल. उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा सल्ला दिला जातो. कारण प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
अर्ज शुल्काविषयी :
- सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ३००० रुपये ठेवण्यात आले आहे.
- तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि EWS साठी अर्ज शुल्क २४०० रुपये ठेवण्यात आले आहे.
- सदर अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरता येणार आहे.
(वाचा : ITBP Recruitment 2023: आयटीबीपीमध्ये २४८ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी)वयोमर्यादा :
AIIMS सामायिक भरती परीक्षा २०२३ साठी वयोमर्यादा वेगळी आहे. १ डिसेंबर २०२३ हा आधार मानून वयाची गणना केली जाईल. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना म्हणजे OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर केली जाईल. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.
तुम्ही असा अर्ज करू शकता :
– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– फॉर्म भरा आणि फी भरा.
– आता फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : Cochin Shipyard Limited मध्ये भरती, BE – BTech उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपयांत मासिक वेतन)