या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
विद्युत सहाय्यक (पारेषण) – १९०३ जागा
वरिष्ठ तंत्रज्ञ – १२४ जागा
तंत्रज्ञ वर्ग १ – २०० जागा
तंत्रज्ञ वर्ग २ – ३१४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २ हजार ५४१ जागा
शैक्षणिक पात्रता:
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय प्रमाणपत्र धारक.
(या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.)
(वाचा: Homework Tips For Student: गृहपाठ पूर्ण होत नाहीय? मग घरी अभ्यास करण्याच्या ‘या’ खास टिप्स नक्की वाचा)
वेतन: (मासिक)
विद्युत सहाय्यक (पारेषण) – प्रथम वर्ष – १५ हजार, द्वितीय वर्ष – १६ हजार, तृतीय वर्ष -१७ हजार
वरिष्ठ तंत्रज्ञ – ३० हजार ८१० ते ८८ हजार ११९०
तंत्रज्ञ वर्ग १ – २९ हजार ९३५ ते ८२ हजार ४३०
तंत्रज्ञ वर्ग २ – २९ हजार ३५ ते ७२ हजार ८५७
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २० नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीमधील ‘विद्युत सहाय्यक’ पदा संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीमधील ‘वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १ आणि तंत्रज्ञ २’ या पदांसंदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: D. Y. Patil Vidyapeeth Bharti 2023: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)