मुंबईच्या ‘सायन हॉस्पिटल’ मध्ये भरती; ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज

LTMGH Sion Hospital Bharti 2023: तुम्ही जर वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि तुम्ही मुंबई महानगरपालिकेत काम करण्यास इच्छुक असाल तर पालिकेच्या ‘सायन हॉस्पिटल’मध्ये म्हणजेच लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीद्वारे ‘सहाय्यक वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना प्रसिद्ध केली असून या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

शैक्षणिक पात्रता: उमेदवार ‘एमबीबीएस’ परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच त्याला संबधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा.

(वाचा: D. Y. Patil Vidyapeeth Bharti 2023: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे येथे विविध पदांची भरती; आजच करा अर्ज)

वेतन: ७५ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण: सायन/ मुंबई

वयोमर्यादा: किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: लो. टि. म. स. रुग्णालयाच्या आवक जावक विभाग, शीव, मुंबई २२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Engineers India Limited Bharti 2023: इंजीनियर्ससाठी ‘ईआयएल’ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगारही आहे भरपूर)

Source link

LTMGH Hospital Bharti 2023LTMGH Hospital Recruitment 2023लो. टि. म. स. रुग्णालय भरती २०२३लोकमान्य टिळक महानगरपलिका सर्वसाधारण रुग्णालय भरतीसायन हॉस्पिटल भरतीसायन हॉस्पिटल भरती २०२३
Comments (0)
Add Comment