महाविद्यालयाने नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २१ नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे तर ३० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणिअर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
लायब्ररी प्रशिक्षणार्थी – ०६ जागा
कम्युटर प्रशिक्षणार्थी – ०६ जागा
फिजिक्स प्रशिक्षणार्थी – ०१ जागा
केमिस्ट्री प्रशिक्षणार्थी – ०१ जागा
मॅथमॅटिक्स प्रशिक्षणार्थी – ०१ जागा
एकूण रिक्त पदे – १५ जागा
(वाचा: Career Tips : कामाच्या ताणामुळे नोकरी नकोशी झालीय? मग या गोष्टी आवर्जून करा)
शैक्षणिक पात्रता: पदाच्या संबधित विषयातील बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
नोकरी ठिकाण: सांगली.
वेतन/ मानधन/ स्टायपेंड : ९ हजार (मासिक)
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २१ नोव्हेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, सांगली’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: CRIS Recruitment 2023 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्र येथे मोठी भरती, ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)