मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा बहाल; यूजीसीकडून ग्रेडेड ऑटोनॉमीचा दर्जा प्रदान

Mumbai University News : देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीकडून मुंबई विद्यापीठास वर्ग-१ (Class-1) विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

राज्यात सर्वाधिक नॅककडून अ++ श्रेणी आणि ३.६५ सीजीपीए गुणांकन असलेल्या मुंबई विद्यापीठास वर्ग-१ ग्रेडेड ऑटोनॉमीचा (Class 1 Graded Autonomy) दर्जा बहाल करण्यात आल्यामुळे मुंबई विद्यापीठात विविध शैक्षणिक संधीचे नवीन दालन आता खुले होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मुंबई विद्यापीठास वर्ग-१ विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठास आता युजीसीच्या परवानगी सुलभतेसह नवीन अभ्यासक्रम, नवीन विभाग, नवीन कँपसेस, नवीन ऑनलाईन अभ्यासक्रम, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे नवीन अभ्यासक्रम सुरु करता येणार आहेत. तसेच, आवश्यकतेनुसार स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गरजा ओळखून नाविन्यतेच्या क्षेत्रात पदवी आणि पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठास सुरु करता येतील.

मुंबई विद्यापीठास मिळालेल्या या वर्ग-१ च्या दर्जामुळे नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्कच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठास कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करता येतील. वर्ग-१ विद्यापीठाच्या दर्जामुळे विद्यापीठास आता स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर रिसर्च पार्क, इन्क्युबेशन सेंटर्स आणि युनिव्हर्सिटी सोसायटी लिंकेजेस् सेंटर्सची स्थापना करता येणार आहे. त्याचबरोबर अटी व शर्तीच्या अधीन राहून निश्चित कालावधीसाठी परदेशी शिक्षकांची नेमणूक करण्याचे आणि गुणवत्तेवर आधारीत परदेशी विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे स्वातंत्र्य विद्यापीठास प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणासाठी परदेशी उच्च शिक्षण संस्थासोबत शैक्षणिक सामंजस्य करणे आता अधिक सुकर झाले आहे. याद्वारे दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्वीनिंग पदवी, विद्यार्थी शिक्षक आदान-प्रदान प्रक्रिया सुलभ होणार आहे.

शैक्षणिक संधीचे नवीन दालन खुली होणार :

“विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ग्रँट ऑफ ग्रेडेड ऑटोनॉमी रेग्युलेशन, २०१८ च्या नियमनानुसार मुंबई विद्यापीठास मिळालेल्या या वर्ग-१ या दर्जामुळे विद्यापीठास शैक्षणिक स्वातंत्र्य बहाल करण्यात आले असून याद्वारे मुंबई विद्यापीठात विविध शैक्षणिक संधीचे नवीन दालन आता खुले होणार आहे. वर्ग-१ च्या दर्जामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने विद्यापीठास मोठे पाऊल टाकता येणार आहे. शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमासोबत कौशल्याधारीत शिक्षण, नवीन अभ्यासक्रम, ऑनलाईन अभ्यासक्रम, उपपरिसरांची निर्मितीसह अनेक उपक्रम आता विद्यापीठात सुरु करता येतील. विशेष म्हणजे या दर्जामुळे दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) सक्षमीकरणास मोठे हातभार लागणार आहे ”
– प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरु, मुंबई विद्यापीठ

(वाचा : UGC NET New Syllabus: यूजीसी-नेटच्या अभ्यासक्रमातही बदल होणार; अभ्यासक्रम बदलण्यासाठी तज्ज्ञांची समिती)

Source link

mu newsmumbai universitymumbai university latest newsmumbai vidyapeethugc granted class1 autonomy to muमुंबई विद्यापीठमुंबई विद्यापीठ बातमी
Comments (0)
Add Comment