‘आयटीआय’ उमेदवारांसाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती; आजच करा अर्ज

Power Grid Corporation Of India limited Recruitment 2023: तुम्ही जर आयटीआय मध्ये शिक्षण घेतले असेल आणि प्रशिक्षणार्थी म्हणून उत्तम संधीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील ‘कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी’ पदाच्या एकूण २०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने नुकतीच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १२ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिशियन) – २०३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २०३ जागा

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिकल ट्रेड मधून उमेदवार आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असावा.

(वाचा: ZP Nagpur Recruitment 2023: नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड)

वयोमर्यादा: कमाल वय २७ वर्षे

वेतन: २१ हजार ५००

अर्ज शुल्क : या भरती करिता २०० रुपये अर्जशुल्क आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क माफ आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १२ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Job Resign Tips: नोकरीचा राजीनामा देताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा…)

Source link

PGCIL bharti 2023PGCIL Recruitment 2023Power Grid Corporation of India Limited jobsPower Grid Corporation of India Limited vacancyrecruitmentपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन भरती २०२३
Comments (0)
Add Comment