NEET-UG च्या पात्रता निकषांमध्ये बदल, आता ‘हे’ विद्यार्थीही कर शकणार मेडिकल अभ्यासक्रमांसाठी अर्ज

NEET UG 2023 : ज्या विद्यार्थ्यानी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (Physics, Chemisty and Mathematics) या मुख्य विषयांसह १० + २ (बारावी) परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत ते अजूनही डॉक्टर बनू शकतात. नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामधून बारावीमध्ये अतिरिक्त विषय म्हणून जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

एनएमसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, “ज्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान (Biology / Biotechnology) आणि इंग्रजीसह बारावी उत्तीर्ण झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांनाही एमबीबीएसच्या प्रवेशासाठी NEET – UG परीक्षेत बसण्याची परवानगी दिली जाईल. या विद्यार्थ्यांना बीडीएस अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. शिवाय, परदेशात शिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांना एनएमसीने दिलेला हा कायदेशीर पुरावा पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रम करण्यास पात्र ठरवणार आहे.

(वाचा : CRPF Recruitment: सीआरपीएफमध्ये जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसरची भरती; ७५,००० रुपयांपर्यंत मिळणार पगार)

यापूर्वी, एमबीबीएस किंवा बीडीएस करण्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र / जैवतंत्रज्ञान या विषयांचा दोन वर्षांचा नियमित पूर्ण करणे आवश्यक होते. जुन्या नियमानुसार जीवशास्त्र /जै वतंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही आवश्यक विषयाचा अभ्यास बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अतिरिक्त विषय म्हणून पूर्ण करता येत नव्हता. मात्र, नवीन एनएमसी आदेशानुसार बदल झाले असून, हे नवे नियम जुन्या नियमाच्या विरुध्द्ध आहेत.

एनएमसीने सांगितल्या प्रमाणे १४ जून रोजी या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर एनईईटी-यूजीसाठी उपस्थित राहण्याचे निकष शिथिल करण्याचा आणि परदेशात औषधाचा अभ्यास करण्यासाठी पात्रता प्रमाणपत्र मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(वाचा : NEET-UG च्या पात्रता निकषांमध्ये बदल, आता ‘हे’ विद्यार्थीही कर शकणार मेडिकल अभ्यासक्रमांसाठी अर्ज)

Source link

Breaking Newsgoogle newsindiaindia newsindia news todaymbbsnational medical commissionnmctoday newsxii
Comments (0)
Add Comment