राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागात महाभरती; आजच अर्ज करा

Adivasi Vikas Vibhag Recruitment 2023: महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग, नाशिक/ नागपूर यांच्या अंतर्गत मोठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक ही आणि अशी विविध संवर्गातील एकूण १९२ पदे भरली जाणार आहेत.

नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १३ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आदिवासी विकास विभाग, नाशिक भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या:
उच्च श्रेणी लघुलेखक
निम्म श्रेणी लघुलेखक
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
संशोधन सहाय्यक
उपलेखापाल/मुख्य लिपिक
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक
लघुटंकलेखक
गृहपाल (पुरुष)
गृहपाल (स्त्री)
अधीक्षक (पुरुष)
अधीक्षक (स्त्री)
ग्रंथपाल
प्रयोगशाळा सहाय्यक
आदिवासी विकास निरीक्षक
सहाय्यक ग्रंथपाल
प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)
माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम)
उच्च माध्यमिक शिक्षणसेवक
प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
एकूण रिक्त पदसंख्या – १९२ जागा

(वाचा: Maharashtra Government Recruitment 2023: राज्य शासनाच्या मराठी भाषा संचालनालयात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडलेली आहे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज शुल्क: या भरतीकरिता १ हजार रुपये अर्ज शुल्क आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज पद्धती: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १३ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Job Resign Tips: नोकरीचा राजीनामा देताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा…)

Source link

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023Adivasi Vikas Vibhag recruitment 2023recruitmentRecruitment 2023आदिवासी विकास विभाग नाशिक भरती २०२३आदिवासी विकास विभाग भरती २०२३
Comments (0)
Add Comment