२१ एप्रिल २०२४, सकाळी १० वाजल्यापासून ३० एप्रिल २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थी JEE Advanced 2024 साठी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. (वेळ IST नुसार)
जेईई २०२४ परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्रे १७ मे २०२४ रोजी उपलब्ध होतील. वास्तविक JEE Advanced 2024 परीक्षा २६ मे २०२४ रोजी होईल, जेईई पेपर १ (JEE Paper 1) सकाळी ९ ते १२ तर, पेपर २ दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत पार पडणार आहे.
JEE Advanced 2024 परीक्षेस पात्र होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी JEE Main 2024 यशस्वीरीत्या उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. शिवाय, JEE Main मधील टॉप २ लाख ५० हजार उमेदवारांमध्ये असले गरजेचे आहे. सोबतच, पात्रतेसाठी विद्यार्थ्यानी १२वी बोर्ड परीक्षेत (किंवा समतुल्य) किमान ७५% गुण मिळणे आवश्यक आहे. तथापि, SC, ST किंवा PwD श्रेणीतील असल्यास, त्यांनी किमान 65% गुण (किंवा समतुल्य) असणे आवश्यक आहे.
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयातील विद्यार्थ्यांची चाचणी करणारे दोन पेपर असतात. हे फक्त गोष्टी लक्षात ठेवण्याबद्दल नाही; हे समस्या सोडवण्याबद्दल आणि तुम्हाला जे माहित आहे ते वास्तविक जगात वापरण्याबद्दल आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनेही हा निकाल महत्त्वाचा ठरतो. JEE Advanced 2024 मध्ये चांगले गुण मिळवणे म्हणजे आयआयटीसारख्या अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची ही गुरुकिल्ली असे म्हटले जाते.
जेईई २०२४ साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून JEE Advanced 2024 साठी अर्ज करायचे आहेत.त्यासाठी जॉइंट अॅडमिशन बोर्ड (Joint Admission Board – JAB) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देणे आवश्यक आहे. सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी ३ हजार २५० तर, SC, ST आणि PwD उमेदवारांसाठी १ हजार ६२५ रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य असणार आहे.
JEE 2024 संपूर्ण वेळापत्रक :
Sr. No | Activity | Day, Date and Time (IST) |
१ | JEE (Main) 2024 [NTA द्वारे संगणक आधारित चाचण्या म्हणजेच CBT] | JEE (Main) 2024 वेबसाइट |
२ | NTA द्वारे JEE (Main) 2024 चा निकाल | JEE (Main) 2024 वेबसाइट |
३ | JEE (Advanced) 2024 साठी ऑनलाइन नोंदणी | रविवार, २१ एप्रिल २०२४ , सकाळी १०:०० वाजल्यापासून मंगळवार, ३० एप्रिल २०२४ , सायंकाळी ५ वाजेपर्यंत |
४ | नोंदणीकृत उमेदवारांची फी भरण्याची शेवटची तारीख | सोमवार, ६ मे २०२४ , सायंकाळी ५ वाजेपर्यंत |
५ | प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध | शुक्रवार, १७ मे २०२४, सकाळी १० वाजल्यपासून रविवार, २६ मे २०२४, दुपारी २.३० वाजेपर्यंत |
६ | ४० % पेक्षा कमी अपंगत्व आणि लेखनात अडचण असलेल्या PwD उमेदवार /उमेदवारांद्वारे लेखकाची निवड | शनिवार, २५ मे २०२४ |
७ | JEE (Advanced) 2024 परीक्षा | रविवार, २६ मे २०२४ पेपर 1: सकाळी ९ ते दुपारी १२ पेपर 2: दुपारी २.३० ते ५.३० |
८ | उमेदवारांच्या प्रतिसादांची प्रत JEE (Advanced) 2024 वेबसाइटवर उपलब्ध असेल | शुक्रवार, ३१ मे २०२४, सायंकाळी ५ वाजता |
९ | Provisional Answer Keys ऑनलाइन उपलब्ध | रविवार, २ जून २०२४, सकाळी १० वाजल्यापासून |
१० | Provisional Answer Keys वर अभिप्राय आणि टिप्पण्या (Feedback and comments on provisional answer keys) | रविवार, २ जून २०२४, सकाळी १० वाजल्यापासून सोमवार,३ जून २०२४, सायंकाळी ५ वाजेपर्यंत |
११ | Final Answer Key आणि JEE (Advanced) 2024 च्या निकालांची ऑनलाइन घोषणा | रविवार, ९ जून २०२४, सकाळी १० वाजता |
१२ | आर्किटेक्चरAptitude Test (AAT) 2024साठी ऑनलाइन नोंदणी | रविवार, ९ जून २०२४, सकाळी १० वाजल्यापासून सोमवार, १० जून २०२४, सायंकाळी ५ वाजेपर्यंत |
१३ | (JoSAA) 2024 Processसंयुक्त जागा वाटप प्रक्रियेची तात्पुरती सुरुवात | सोमवार, १० जून २०२४, सायंकाळी ५ वाजता |
१४ | आर्किटेक्चर अॅप्टिट्यूड टेस्ट (AAT) 2024 | बुधवार, १२ जून २०२४ सकाळी ९ ते दुपारी १२ |
१५ | AAT 2024 च्या निकालांची घोषणा | शनिवार, १५ जून २०२४, सायंकाळी ५ वाजता |
JEE Advanced 2024 साठी असा करा अर्ज :पायरी १ : JEE Advanced 2024 च्या https://jeeadv.ac.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
पायरी २ : अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी “Registration” किंवा “Apply Online” लिंकवर क्लिक करा. नवीन खाते तयार करण्यासाठी आवश्यक तपशील भरा.
पायरी ३ : अचूक वैयक्तिक, शैक्षणिक आणि संपर्क माहितीसह अर्ज भरा. तुमचं अर्ज सबमिट करण्यापूर्वी त्रुटींसाठी दोनदा तपासा.
पायरी ४ : फोटो, स्वाक्षरी आणि इतर निर्दिष्ट (recent photograph, signature, and other specified certificates०) प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
पायरी ५ : प्रदान केलेल्या पेमेंट गेटवेद्वारे अर्ज फी भरा. वेगवेगळ्या श्रेणींसाठी फी भिन्न असू शकते; आपण योग्य पर्याय निवडल्याची खात्री करा.
पायरी ६ : यशस्वी पेमेंट केल्यानंतर, तुमचा अर्ज सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट तुमच्याकडे ठेवा. तुमचा नोंदणी क्रमांक आणि लॉगिन क्रेडेन्शियल्सची नोंद ठेवा.