‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ मध्ये महाभरती, ६०० हून अधिक रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा

Bharat Heavy Electricals Limited Recruitment 2023: तुम्ही आयटीआय केलं असेल किंवा पदवीधर असाल तर ‘भेल’ या कंपनीत महाभरती सुरू आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदांच्या एकूण ६८० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
ट्रेड अप्रेंटिस – ३९८ जागा
टेक्निशियन अप्रेंटिस – १०३ जागा
ग्रॅज्युएट अप्रेंटिस – १७९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: ६८० जागा

शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस – उमेदवार बारावी असावा तसेच संबंधित ट्रेड मधील NCVT/SCVT मान्यताप्राप्त तीन वर्षांचा पूर्णवेळ ‘आयटीआय’ अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

टेक्निशियन अप्रेंटिस – उमेदवार बारावी असावा तसेच संबंधित फील्डमधील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असावा.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस – उमेदवार संबंधित फील्डमधील मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून पदवीधर असावा.

(या व्यतिरिक्त शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार विस्तृतपणे अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे. )

(वाचा: Dalmia Lions College Recruitment 2023: मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील)

वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ‘ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली ट्रेड अप्रेंटिस पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली टेक्निशियन अप्रेंटिस पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाची अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०१ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: KNS Bank Recruitment 2023: मुंबईच्या कुर्ला नागरिक सहकारी बँकेत भरती; व्यवस्थापक ते शिपाई पदांसाठी आजच अर्ज करा)

Source link

bharat heavy electricals limited jobsbhel bharti 2023bhel recruitment 2023recruitmentभारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती २०२३
Comments (0)
Add Comment