सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती; आजच करा अर्ज

Pune University Recruitment 2023: तुम्ही विज्ञान शाखेतून पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले असेल आणि उत्तम संधीची वाट पाहत असाल तर पुणे विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘प्रकल्प सहाय्यक’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नुकतीच याबाबत पुणे विद्यापीठाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदाकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून ०८ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्रकल्प सहाय्यक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता: उमेदवार संबंधित विषयात एमएससी/ एमटेक असावा. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
(M.Sc./MTech in Biotechnology/Biochemistry/Zoology/Medical Biotechnology/Genetics/; M.Pharm (Pharmacology/Pharmaceutical Biotechnology)

(वाचा: Dalmia Lions College Recruitment 2023: मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील)

वेतन: २५ हजार ४०० (मासिक)

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन / ई-मेल द्वारे

निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता: जैवतंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे.

अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: amulsakharkar@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पुणे विद्यापीठ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच ईमेल पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: BHEL Recruitment 2023: ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ मध्ये महाभरती, ६०० हून अधिक रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा)

Source link

pune university bharti 2023pune university recruitment 2023recruitmentuniversity recruitmentपुणे विद्यापीठ भरती २०२३सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Comments (0)
Add Comment