त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०८ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वाहनचालक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून या पदाकरिता उमेदवार शासन मान्यता प्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारकडे हलके वाहन, मध्यम प्रवासी वाहन किंवा अवजड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना असावा. तसेच वाहन चालवण्याचा तीन वर्षांचा अनुभव देखील असावा.
वयोमर्यादा : कमाल ३८ वर्षे
(वाचा: BHEL Recruitment 2023: ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स’ मध्ये महाभरती, ६०० हून अधिक रिक्त जागांसाठी आजच अर्ज करा)
वेतन: १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० (मासिक)
अर्ज पद्धती: ऑफलाइन
निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Dalmia Lions College Recruitment 2023: मुंबईच्या दालमिया लायन्स कॉलेजमध्ये भरती; जाणून घ्या पदांचे सर्व तपशील)