या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून १० डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
तांत्रिक सहाय्यक – ४९
तंत्रज्ञ – १ – ३१
एकूण रिक्त पदसंख्या – ८० जागा.
शैक्षणिक पात्रता: पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे सविस्तर तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संकेतस्थळाची लिंक खाली जोडली आहे.
नोकरी ठिकाण: पुणे.
(वाचा: Maha Metro Recruitment 2023: ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन’मध्ये भरती, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)
वेतन : (मासिक)
तांत्रिक सहाय्यक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये
तंत्रज्ञ – १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: २७ नोव्हेंबर २०२३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १० डिसेंबर आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Pune Recruitment 2023: दहावी ते पदवीधरांसाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पुणे येथे विविध पदांची भरती)