‘भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही’

हायलाइट्स:

  • राणेंच्या अटकेवरून महाविकास आघाडी-भाजपमध्ये शाब्दिक युद्ध
  • आशिष शेलारांच्या इशाऱ्याला नवाब मलिक यांचं उत्तर
  • भाजपच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही – नवाब मलिक

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर आता भाजप व महाविकास आघाडीमध्ये शहकाटशहाचा खेळ सुरू होण्याची शक्यता आहे. भाजपकडून राणेंवरील कारवाईला उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी तसे संकेतही दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:राजू शेट्टी पुन्हा भाजपसोबत जाणार? ‘या’ भूमिकेमुळं तर्कवितर्कांना उधाण

नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी ट्वीट केलं होतं. ‘करारा जवाब मिलेगा’ अशा आशयाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्वीट केला होता. भाजपचे नेते अॅड. आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. अनिल परब यांनी पदाचा गैरवापर केला आहे. राणेंना चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यास पोलीस अधिकाऱ्यांना भाग पाडलं. तसंच, दलालांमार्फत न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केला. या सगळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली होती. ‘सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करू,’ अशी धमकीच शेलार यांनी महाविकास आघाडीला दिली होती.

वाचा: ‘नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यांनी मर्यादेत राहावं’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांच्या या इशाऱ्यांचा व धमक्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला आहे. ‘भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही,’ असं मलिक यांनी म्हटलं आहे. ‘भाजपला जे करायचं आहे ते करावं. कुणाच्याही विरोधात तक्रार दाखल करावी. नकली केसमध्ये अडकवा किंवा जेलमध्ये ठेवा आणि सत्तेचा दुरुपयोगही करा. ही काही नवीन गोष्ट नाही,’ असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

वाचा: हायकमांड सक्रिय! अमित शहांचा नारायण राणेंना फोन; काय झाली चर्चा?

Source link

maha vikas aghadiMaha Vikas Aghadi Vs BJPMaharashtra politicsNarayan RaneNawab Malik Reply to BJPWar on Words between BJP and MVAमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment