त्यांची हुशारी प्रचंड होती. त्यामुळे शाळेतही ते अव्वल ठरले. पुढे ज्योतिबा केवळ शिक्षण घेऊन थांबले नाही तर त्यावेळी समाजात घडणार्या अनिष्ट रूढी आणि परंपरा यावरही त्यांनी ताशेरे ओढले. त्यावेळच्या जात वास्तवाला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कुणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही म्हणत सर्व समानतेचा संदेश फुले यांनी दिला. आपल्या मित्रांसोबत समाज सुधारण्याची मोठी चळव ज्योतिबा यांनी उभी केली.
(वाचा: NIIH Mumbai Recruitment 2023: मुंबईतील ‘एनआयआयएच’ इंस्टिट्यूट मध्ये भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)
ज्योतिबा यांचा सावित्री बाईंशी विवाह झाल्यानंतर त्यांनी सावित्री बाईंमध्ये देखील शिक्षणाची आवड निर्माण केली. जर देश पुढे न्यायचा असेल, समाजात सुधारणा करायची असेल तर घरातली स्त्री शिकली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. म्हणूनच त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून सावित्रीबाईंना शिक्षण दिले. सावित्रीबाईंप्रमाणेच प्रत्येक घरातील स्त्री शिकावी अशी त्यांची तळमळ होती. समाजातील तळागळातील लोकांसोबतच स्त्रियाही साक्षर झाल्या पाहिजे या ध्यासाने त्यांनी १९४८ मध्ये पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली.
स्त्रियांना शिकवले तर स्त्रिया डोईजड होईल म्हणून समाजाने फुलेंना प्रखर विरोध केला. वेळप्रसंगी शाळेत शिकवायला येणार्या मास्तरांनाही पळवून लावले. पण हार मानतील ते ज्योतिबा कसले. त्यांनी थेट सावित्रीबाईंनाच शिक्षिका म्हणून उभे केले आणि स्त्री शिक्षणाचे काम अविरत सुरू ठेवले.
पुढे फुले दांपत्याला अनेक हाल भोगावे लागले. रस्त्यातून जाताना लोक त्यांना दगड मारी, तर कुणी चिखल शेण अंगावर टाकी. अगदी त्यांच्या कुटुंबावर दबाव आणून त्यांना घरा बाहेर काढण्यापर्यंत लोकांनी त्रास दिला. पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि त्यासाठी आपण झटलेच असा थोर विचार फुले यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी त्यांचे आयुष्य पूर्णतः समाजासाठी वेचले.
ज्याकाळात सामान्य लोकांनाच शिक्षण घेण्याची बंदी होती त्याकाळी समाजातील सर्व स्त्रियांना शिक्षण देण्याचा विचार हा प्रचंड काळाच्या पुढे घेऊन जाणारा होता. त्यांनी दगड गोटे खाल्ले म्हणून स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला आणि आज देशात शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकली.
(वाचा: Pune Recruitment 2023: दहावी ते पदवीधरांसाठी न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पुणे येथे विविध पदांची भरती)