नुकतीच ‘एम्स’ने या भरतीबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून या पदांकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०७ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर २०२३ भरती’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्राध्यापक – ०९ जागा
अतिरिक्त प्राध्यापक – १० जागा
सहयोगी प्राध्यापक – ११ जागा
सहायक प्राध्यापक – १२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ४२ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्याचे सविस्तर तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली केली आहे.
(वाचा: Jyotirao Phule Death Anniversary: स्त्री शिक्षणासाठी दगड धोंडे खाणार्या महात्मा फुलेंचा असा होता खडतर प्रवास..)
वेतन :
प्राध्यापक – १ लाख ६८ हजार ९०० ते २ लाख २० हजार ४००
अतिरिक्त प्राध्यापक – १ लाख ४८ हजार २०० ते २ लाख ११ हजार ४००
सहयोगी प्राध्यापक – १ लाख ३८ हजार ३०० ते २ लाख ९ हजार २००
सहायक प्राध्यापक – १ लाख १ हजार ५०० ते १ लाख ६७ हजार ४००
नोकरी ठिकाण : नागपूर
अर्ज शुल्क : खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी २ हजार रुपये तर एससी/ एसटी प्रवर्गासाठी ५०० रुपये.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०७ डिसेंबर जानेवारी आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: RMVS Recruitment 2023: शासनाच्या ‘राज्य मराठी विकास संस्था’ येथे भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)