मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात तातडीची भरती; ही संधी सोडू नका

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2023: तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर तुमच्यासाठी मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यासाठी विविध पदे भरली जाणार आहेत. नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट या पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.

‘बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे:
वैद्यकीय अधिकारी
स्टाफ नर्स
फार्मासिस्ट

शैक्षणिक पात्रता:
वैद्यकीय अधिकारी – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणीकृत असावा.

स्टाफ नर्स – उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा म्हणजेच बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. तसेच उमेदवार जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी अभ्यासक्रमाचा पूर्णवेळ डिप्लोमाधारक असावा.

फार्मासिस्ट – उमेदवाराकडे राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका किंवा पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्य कौन्सिलकडे नोंदणीकृत असावा. पदवी प्राप्त उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

(वाचा: AIIMS Nagpur Recruitment 2023: ‘एम्स’ नागपूर येथे मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

वेतन:
वैद्यकीय अधिकारी – किमान ७० हजार ते कमाल १ लाख १० हजार
स्टाफ नर्स – किमान २५ हजार ते कमाल ४० हजार
फार्मासिस्ट – किमान १८ हजार ते कमाल २५ हजार रुपये

नोकरी ठिकाण: मुंबई

वयोमर्यादा:
वैद्यकीय अधिकारी – कमाल ७० वर्षे
स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट – कमाल ५८ वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Startup Tips: स्वतःचा ‘स्टार्टअप’ सुरू करताय? मग या सात टिप्स कधीही विसरू नका)

Source link

bmc bharti 2023bmc recruitment 2023Mumbai mahanagarpalika recruitment 2023recruitmentबृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३मुंबई महानगरपालिका भरती
Comments (0)
Add Comment