बँक ऑफ इंडियाच्या रायगड शाखेमध्ये ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Bank of India Recruitment 2023: तुम्ही पदवी किंवा पदविका शिक्षण प्राप्त केले असेल तर तुमच्यासाठी एक रायगड मध्ये एक खास संधी आहे. बँक ऑफ इंडिया यांच्या ‘आरएसईटीआय’ विभागाद्वारे रायगड येथील झोनल शाखेसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘फॅकल्टी’ पदाची रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

नुकतीच याबाबत ‘बँक ऑफ इंडिया’ने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदाकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २० डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘बँक ऑफ इंडिया रायगड झोनल शाखा भरती २०२३’ मधील पदे आणि इतर तपशील:
पदाचे नाव – फॅकल्टी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा आणि त्याने संबंधित विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. ( Minimum Graduation. Diploma in vocational course preferable ) याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: BMC Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात तातडीची भरती; ही संधी सोडू नका)

वेतन: २० हजार (मासिक)

नोकरी ठिकाण : रायगड

वयोमर्यादा :
किमान २५ ते कमाल ६५ वर्षे

अर्ज पद्धती :
ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया, रायगड झोनल ऑफिस, दुसरा मजला, हॉटेल मीरा माधव बिल्डिंग, एसटी स्टँड समोर, अलिबाग जि. रायगड – ४०२२०१.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा त्यानंतर मुलाखत आणि कौशल्य चाचणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २० डिसेंबर आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Ahmednagar Recruitment 2023: अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठी भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)

Source link

bank of india bharti 2023boi recruitment 2023BOI RSETI Recruitment 2023recruitmentबँक ऑफ इंडिया भरतीबँक ऑफ इंडिया भरती २०२३
Comments (0)
Add Comment