शालेय मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती; तुमच्या मुलीच्या शाळेत आजच करा चौकशी

Savitribai Phule Pre Matric Scholarship 2023 : शाळेतील मुलींची संख्या वाढावी आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य मिळावे, विद्यार्थिंनींची दैनंदिन उपस्थिती १०० टक्के राहावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे.

याअंतर्गत विद्यार्थिनींना ६०० रुपयांपासून ते ३ हजारांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृती मिळवण्यासाठी शाळांमधून समाजकल्याण विभागाकडे विद्यार्थिनींची माहिती पाठविण्यात येते. तेथून, शिष्यवृत्ती मंजूरी झाल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या थेट बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा केली जाते.

‘सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती’ चा या विद्यार्थिनींना होणार शिष्यवृत्तीचा फायदा :

सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही पाचवी ते दहावीतील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींना शिष्यवृत्ती स्वरुपात दिली जाते.मात्र या साथी सदर विद्यार्थिनीची दैनंदिन उपस्थिती अनिवार्य आहे. किमान, ७५ टक्के उपस्थिती असल्यास पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना ६०० रुपये दिले जातात. तर, आठवी ते दहावीतील विद्यार्थिनीना १ हजार रुपये प्रतिवर्षाला दिले जातात.

एवढी शिष्यवृत्तीची रक्कम :

राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवर्गातील विद्यार्थिनींना ६०० ते तीन हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते.
आदिवासी सुवर्ण महोत्सवी योजनेत विद्यार्थ्यांना १५०० हजार रुपये मिळतात. त्याशिवाय, इतर शिष्यवृत्तीही ३ हजार रुपयांपर्यंत देण्यात येतात.

हे आहेत पात्रता निकष :

पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींची किमान ७५ टक्के उपस्थिती असल्यासच त्या मुलींना शिष्यवृत्ती देण्यास समाज कल्याण विभाग मंजूरी देते. आणि अशा मुलींचीच नावे शाळेकडून पाठवण्यात येतात.
शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र, मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखल असणे अनिवार्य आहे.

ही आहेत आवशयक कागदपत्रे :

राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना

  • राष्ट्रीयीकृत बँकेत खाते,
  • आधार कार्ड,
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • विद्यार्थिनीच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला
  • मुख्याध्यापकांचा संबंधित प्रवर्गाचा दाखला
  • जातीचा दाखला

ही कागदपत्रे आवश्यक असतात. शाळा ही माहिती जमा करून समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवते. त्यानंतर, तपासणी करून संबंधितांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.

Source link

Educational scholarshipGovernment Scholarshipsamajkalyan vibhagsavitribai phule pre matric scholarshipsavitribai phule scholarship 2023savitribai phule scholarship applicationscholarship for girls studetsscholarship for school girlsसावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
Comments (0)
Add Comment