‘युनियन बँक ऑफ इंडिया’ मध्ये भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Union Bank of India Recruitment 2023: तुम्ही कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी केली असेल तर तुमच्यासाठी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘युनियन लर्निंग अकादमी हेड्स’ (ULA)’ या पदाच्या एकूण ०७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून २१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
युनियन लर्निंग अकादमी हेड्स (ULA) – ०७ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०७ जागा

शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी. बँकिंग क्षेत्राशी किंवा त्या विशिष्ट पदाशी संबधित पदव्युत्तर पदवी असणार्‍या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

(वाचा: BOI RSETI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियाच्या रायगड शाखेमध्ये ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण : भारतातील काही प्रमुख केंद्रांवर

वयोमर्यादा : किमान ३० वर्षे आणि कमाल ५० वर्षे. कमाल वयोमर्यादेत राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती करीत थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २१ डिसेंबर आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: AIIMS Nagpur Recruitment 2023: ‘एम्स’ नागपूर येथे मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

bank jobsrecruitmentUnion Bank of India Bharti 2023Union Bank of India Recruitment 2023युनियन बँक ऑफ इंडिया भरती २०२३
Comments (0)
Add Comment