नुकतीच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. ही भरती सेवा निवृत्त अधिकार्यांसाठी आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता आणि मुलाखतीचे तपशील जाणून घेऊया.
‘कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक – ०१ जागा
सेवानिवृत्त लेखाधिकारी – ०१ जागा
उपमुख्य लेखा परीक्षक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा
पात्रता :
सेवानिवृत्त उप परिवहन प्रशासक – उमेदवार कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय परिवहन सेवेतून उप परिवहन व्यवस्थापक म्हणून सेवा निवृत्त किंवा स्वेच्छा निवृत्त.
सेवानिवृत्त लेखाधिकारी – उमेदवारास कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका येथे ०५ वर्षे लेखा विभागात काम केल्याचा अनुभव.
उपमुख्य लेखा परीक्षक – उमेदवारास कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय, नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका येथे ०५ वर्षे लेखा परीक्षण विभागात काम केल्याचा अनुभव.
नोकरी ठिकाण : कल्याण
वयोमर्यादा : कमाल ६५ वर्षे.
निवड प्रक्रिया : थेट मुलाखती द्वारे
मुलाखतीची तारीख : ११ डिसेंबर २०२३
मुलाखतीची पत्ता : कल्याण डोंबिवली महानगरपालिका, परिवहन मुख्यालय, शंकरराव चौक, कल्याण – पश्चिम
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कल्याण डोंबिवली महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: या भरतीकरिता पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड होणार आहे. मुलाखत प्रक्रिया ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होणार आहे. उमेदवारांनी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन वर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. तसेच मुलाखतीला येण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
(वाचा: BOI RSETI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियाच्या रायगड शाखेमध्ये ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)