‘काही जुने व्हायरस परत आलेत; त्यांचा बंदोबस्त करायचाय’

मुंबई: राज्यात मागील दोन दिवस सुरू असलेल्या राजकीय राड्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज प्रथमच जाहीर कार्यक्रमात दिसले. या कार्यक्रमात करोनाच्या परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी काही जुने व्हायरस परत आल्याचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावरून आता चर्चा रंगली आहे. (Uddhav Thackeray on Virus)

वाचा: ‘ती’ वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येऊ नये: उद्धव ठाकरे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. भाजपच्या कार्यालयांवर हल्ले झाले. राणेंच्या विरोधात तीन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंना अटक केली व त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यानच्या काळात भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप झाले. या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे शांत होते. आज प्रथमच त्यांनी एका उद्योगविषयक संमेलनात भाग घेतला. आपल्या भाषणात ते राजकीय टिप्पणी करतात का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र, त्यांनी थेट कोणाचाही उल्लेख टाळला.

वाचा: ‘नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यांनी मर्यादेत राहावं’

उद्योग क्षेत्राच्या अडचणी व करोनानंतरची टाळेबंदी यावरच ते बोलले. मात्र, त्यांनी यावेळी काही सूचक वक्तव्ये केली. ‘जनतेला आणखी सवलती द्यायच्या आहेत. मात्र, वातावरण विचित्र असल्यामुळं आम्ही सावध पावलं टाकत आहोत. अजूनही थोडे दिवस थांबावं लागणार आहे. करोनाचं संकट खरंच गेलंय का हे कळायला मार्ग नाही. अजूनही हे संकट पुरतं गेलेलं नाही. नवे व्हायरस येत आहेतच, पण काही जुने व्हायरसही परत आले आहेत. हे जुने व्हायरस वेगवेगळ साइड इफेक्ट्स पसरवण्याचा प्रयत्न करताहेत. त्या व्हायरसचा आणि या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे,’ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

वाचा: हायकमांड सक्रिय! अमित शहांचा नारायण राणेंना फोन; काय झाली चर्चा?

Source link

cm uddhav thackerayCM Uddhav Thackeray in Industrial Conclaveshiv senauddhav thackeray news todayuddhav thackeray on virusउद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment