या भरतीमधील पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
प्रशासकीय प्रमुख – ०१ जागा
विविध विभागातील तांत्रिक अधिकारी- ०५ जागा
विधी अधिकारी – ०१ जागा
सहायक – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०९ जागा
शैक्षणिक पात्रता :
प्रशासकीय प्रमुख – शासनातील अवर सचिव दर्जापेक्षा कमी पात्रता नसलेले निवृत्त अधिकारी
तांत्रिक अधिकारी-१ – पर्यावरण विषयात पदव्युत्तर पदवी (M.SC/M.E. Environment)
तांत्रिक अधिकारी -२ – स्थापत्य क्षेत्रात अभियांत्रिकी पदवी (B. Tech -Civil)
तांत्रिक अधिकारी – ३ – रसायनशास्त्र विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (B.Tech(Chemical)/ M.Sc. Chemistry)
तांत्रिक अधिकारी -४ – वनस्पती शास्त्र किंवा प्राणीशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (M.Sc. Botany/Zoology)
तांत्रिक अधिकारी – ५ – जिओ इन्फॉर्मेटिक्स मध्ये अभियांत्रिकी पदवी (B.E.- Geo Informatics)
विधी अधिकारी- कायदा विषयात पदवी (L.L.B.)
सहायक – विज्ञान पदवीधर
(वाचा: KDMC Recruitment 2023: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड)
वेतन: (मासिक)
प्रशासकीय प्रमुख – ६० हजार
सर्व तांत्रिक अधिकारी – ४० हजार
सहायक – ३० हजार
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : प्रशासकीय प्रमुख पदासाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे तर इतर सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Union Bank of India Recruitment 2023: ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ मध्ये भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)