बारावीनंतर थेट रेल्वेमध्ये नोकरी हवीय? मग जाणून घ्या ‘टीटीई’ विषयी खास माहिती

Career In Railways After 12th : रेल्वे भरती हा भारतीयांसाठी कायमच उत्सुकतेचा विषय राहीला आहे. दरवर्षी देशातील लाखो तरुण रेल्वे भरतीची वाट पाहत असतात. तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारित येणार्‍या या भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवार कसोशीने प्रयत्न करत असतात.

परंतु अनेकांना असे वाटते की रेल्वे भरती ही अशक्य गोष्ट आहे. पण तुम्ही बारावी परीक्षा उत्तीर्ण होऊनही रेल्वे भरती साठी तयारी करू शकता. रेल्वे मध्ये अनेक विभाग आहेत जिथे बारावी नंतर संबधित परीक्षा देऊन तुम्ही नोकरीसाठी रुजू होऊ शकतात. त्यातीलच एक म्हणजे ‘टीटीई’ परीक्षा.

आता ‘टीटीई’ म्हणजे नेमके काय? हे पद कोणते? ही परीक्षा कोणती असे प्रश्न अनेकांना पडले असतील. तेव्हा या परीक्षे विषयी, या नोकरी विषयी, त्यासाठी लागणार्‍या शैक्षणिक पात्रतेविषयी आज सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘टीटीई’ म्हणजे काय:
‘टीटीई’ म्हणजेच ट्रॅव्हलिंग तिकीट एग्जामिनर. ज्याला मराठीत प्रवास तिकीट परीक्षक असे म्हणतात. भारतीय रेल्वे मधील हे एक महत्वाचे पद आहे. आपल्याला केवळ ‘टीसी’ म्हणजेच तिकीट चेकर हेच पद माहीत असते. पण ‘टीटीई’ देखील असेच एक पद आहे. या दोन्ही पदांमध्ये अगदी थोडासा फरक आहे. या दोन्ही पदांचे अधिकारी हे रेल्वेमध्ये तिकीट चेक करण्याचेच काम करतात. परंतु ‘टीसी’ हे रेल्वे स्टेशनवर तिकीट चेक करण्याचे काम करतात तर ‘टीटीई’ हा रेल्वेमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट चेक करतात. त्यामुळे हे पद देखील महत्वाचे आहे आणि विशेष म्हणजे बारावी नंतर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

(वाचा: BOI RSETI Recruitment 2023: बँक ऑफ इंडियाच्या रायगड शाखेमध्ये ‘या’ पदासाठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)

या भरतीसाठी ‘ही’ आहे पात्रता:
टीटीईच्या पदासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे उमेदवार ५०% गुणांसहीत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच १२ वी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही बारावी नंतर या भरतीची तयारी करू शकता. परंतु या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराने किमान १८ ते कमाल ३० या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे. या वयोमर्यादेत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे सवलत देण्यात आली आहे..

‘टीटीई’साठी तयारी करताना:

‘टीटीई’ म्हणून रेल्वे मध्ये रुजू व्हायचे असेल तर तुम्हाला रेल्वे भरती सुरू होते तेव्हा एक ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर रेल्वे विभागाकडून घेतली जाणारी एक लेखी परीक्षा द्यावी लागते. या लेखी परीक्षेत १५० प्रश्नांची उत्तरे उमेदवाराला द्यावी लागतात. ज्यामध्ये सामान्य ज्ञान (General Knowledge), तर्क-वितर्क, गणित इत्यादी विषयांतल प्रश्नांचा समावेश असतो.

अशी असते परीक्षा:
रेल्वे भरतीच्या तयारीसाठी हल्ली अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. शिवाय इंटरनेट वर देखील या परीक्षे विषयी बरीच माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही जर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर पुस्तकांची मदत घेऊ शकता. त्यासोबतच मागील भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा देखील आधार घेऊ शकता. टीटीईची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागते. या चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते आणि ते नोकरीमध्ये रुजू होतात.

(वाचा: MPCB Mumbai Recruitment 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)

Source link

career after 12thcareer after hsc in railwaycareer in railwaysCareer Tipsjob in railwaystte exam in railway
Comments (0)
Add Comment