जयंत पाटील चले जाव…! जयंत पाटील यांच्या निषेधार्थ खड्यात वृक्षारोपण करून भाजपचे आंदोलन

हायलाइट्स:

  • जयंत पाटील चले जाव…!
  • पूरग्रस्तांना मदत देण्यात अपयशी ठरल्याने भाजप आक्रमक
  • जयंत पाटील यांच्या निषेधार्थ खड्यात वृक्षारोपण करून भाजपचे आंदोलन

सांगली : महापुरानंतर महिना उलटला तरी अजूनही सांगलीतील पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. महाविकास आघाडी सरकारकडून केवळ घोषणा होतात. प्रत्यक्षात काहीच मदत मिळत नाही. याला सांगलीचे पालकमंत्री जबाबदार आहेत. जिल्ह्यात करोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात त्यांना अपयश आले. आता महापुरानंतर पूरगेरस्तांना मदत देण्यात देण्यातही ते अपयशी ठरले आहेत.

यामुळे सांगलीकरांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जयंत पाटलांना जलसंपदा विभागाच्या मंत्री पदावर हटवावे, तसेच सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः घ्यावी, अशी मागणी सांगलीतील युवक भाजपने केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी गुरुवारी खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन केले.

महापुरानंतर राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याचा राग सांगलीत थेट पालकमंत्र्यांवर व्यक्त केला जात आहे. मदत मिळण्यास होणा-या विलंबाला सांगलीतील युवक भाजपने पालकमंत्री जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे. महापुरापूर्वी जिल्ह्यात करोनाचा संसर्ग वाढला होता.

सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेसचा मास्टर प्लॅन, २ तारखेला शरद पवारांचा दौरा
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि पालकमंत्र्यांच्या प्रचारसभा, मेळावे यामुळेच संसर्ग वाढल्याचा आरोप युवक भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी केला आहे. महापुराला जलसंपदा विभाग कारणीभूत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. जलसंपदा विभागाने धरणांमधून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले नाही, यामुळेच सांगली शहर जलमय बनले, असा आरोप पवार यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने जयंत पाटील यांच्याकडील जलसंपदा विभागाचा कार्यभार काढून घ्यावा. तसेच सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वतः घ्यावी अशी मागणी पृथ्वीराज पवार यांनी केली.

या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी युवक भाजपने गुरुवारी सांगलीत आंदोलन केले. खड्ड्यात वृक्षारोपण करून जयंत पाटील यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. चले जाव चले जाव, जयंत पाटील चले जाव…! अशा घोषणा देऊन जयंत पाटील यांच्या अपयशाचा पाढा वाचण्यात आला.

पूर नियंत्रणासाठी सांगली शहरात पूर संरक्षक भिंत बांधण्याची आणि पंचगंगा नदीचे पाणी बोगद्याद्वारे राजापूर बंधा-यापुढे सोडण्याची कल्पनाही अव्यवहार्य असल्याची टीका पवार यांनी केली आहे. केवळ लक्ष विचलित करण्यासाठीच जयंत पाटील यांचा हा प्रयत्न सुरू आहे. यापेक्षा राज्य सरकारने कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आंदोलनासाठी मोठ्या संख्येने युवक भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘ती’ वेळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर येऊ नये: उद्धव ठाकरे

Source link

BJP agitationBJP protestjayant patil news marathijayant patil today newssangli news livesangli news todaysangli news today livesangli weather
Comments (0)
Add Comment