दहावी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; महावितरणमध्ये होणार नवीन भरती

Mahavitaran Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ०६ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ ठरवण्यात आली आहे.

पदभरतीचा तपशील :

संस्था : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद
भरले जाणारे पद : शिकाऊ उमेदवार (apprentice-ship)

पदनिहाय जागांचा तपशील :

एकूण रिक्त जागा : १५० जागा

वीजतंत्री ट्रेड (Electrician) : ६५ जागा
तारतंत्री ट्रेड (Wireman) : ६५ जागा
संगणक चालक (Copa) : २० जागा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण : औरंगाबाद

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : ०६ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२३

(वाचा : ICMR NIV Recruitment 2023: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये भरती, १० डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद मधील भरतीसाथी अर्ज करणारा उमेदवार दहावी / आयटीआय पास असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मधील अप्रेंटिसशीपसाठी असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन (नोंदणी) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. ऑनलाईन अर्ज सादर करताना गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
5. शैक्षणिक व इतर कागदपत्रांची साक्षांकीत छायांकित प्रत सादर न करणा-या उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
6. अर्ज प्रक्रिया ६ डिसेंबर २०२३ पासून सुरु होईल.

महत्त्वाचे :

  • उमेदवारचे Apprentice Portal वर ऑनलाइन रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराची निवड आयटीआय (ITI)च्या ४ सत्रांच्या मिळालेल्या एकूण गुणाच्या सरासरीनुसार तसेच, महाराष्ट्र शासनाच्या आरक्षणानुसार करण्यात येईल.
  • भरती प्रक्रियेत आवश्यकता असल्यास कोणताही बदल करण्याचे किंवा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे असेल.
  • उमेदवाराने लोकप्रतिनिधी अथवा राजकीय व्यक्तीकडून दबाव आणल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याचे सर्व अधिकार संस्थेकडे असतील.
  • निवड झालेल्या पात्र उमेदवारांची प्राथमिक पडताळणी यादी २० डिसेंबर रोजी मंडल कार्यालय धाराशीव येथील नोटीस बर्डावर प्रकाशित करण्यात येईल.

काही महत्वाच्या लिंक्स :
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरातीचे PDF पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

(वाचा : AFCAT Recruitment 2024: एअर फोर्स कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट २०२४ साठी अर्ज सुरू झाले, असा करा अर्ज)

Source link

aurangabad mahavitaran recruitment 2023dharashiv mahavitaranMahavitaran Bharti 2023Mahavitaran Recruitmentmahavitaran recruitment 2023महावितरण भरती
Comments (0)
Add Comment