मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023: तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत मोठी भरती राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध संवर्गातील एकूण १३ पदे भरली जाणार आहेत. नुकतीच पालिकेने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या भरतीमध्ये वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, कम्युनिकेशन विशेषज्ञ या पदांचा समावेश आहे.

या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १५ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ – ०१ जागा
कीटकशास्त्रज्ञ – ०२ जागा
पशुवैद्यकीय अधिकारी – ०१ जागा
अन्न सुरक्षा तज्ञ – ०१ जागा
प्रशासन अधिकारी – ०१ जागा
तांत्रिक अधिकारी (वित्त) – ०१ जागा
संशोधन सहाय्यक – ०१ जागा
तांत्रिक सहाय्यक – ०२ जागा
प्रशिक्षण व्यवस्थापक – ०१ जागा
डेटा विश्लेषक – ०१ जागा
कम्युनिकेशन विशेषज्ञ – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या: १३ जागा

(वाचा: MPCB Mumbai Recruitment 2023: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून संबधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसंदर्भात सविस्तर माहिती जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

वेतन: (मासिक)
वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ – १ लाख २५ हजार ते १ लाख ७५ हजार
कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त) – ७५ हजार रुपये
अन्न सुरक्षा तज्ञ, कम्युनिकेशन विशेषज्ञ – ५० हजार रुपये
संशोधन सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक – ६० हजार
तांत्रिक सहाय्यक – ३० हजार

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती :
ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :
१५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: BOB Recruitment 2023: ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज)

Source link

bmc bharti 2023bmc recruitment 2023Brihanmumbai Municipal Corporation Recruitmentrecruitmentमुंबई महानगरपालिका भरतीमुंबई महापालिका भरती २०२३
Comments (0)
Add Comment