पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती

Western Railway Hospital Recruitment 2023 : वेस्टर्न रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये मेडिसिन जीडीएमओ-सीएमपी, रेडिओलॉजी सीएमपी-स्पेशालिस्ट, ऑर्थोपेडिक-सीएमपी-स्पेशलिस्ट, सीएमपी-स्पेशलिस्ट, सीएमपी-स्पेशॅलिस्ट, मेडिसिन या पदांसाठी मुलाखतीच्या माध्यमातून भारती केली जाणार आहे. करार तत्त्वावर या पदांच्या सगळ्या जागा भरल्या जाणार असून, ४ डिसेंबर रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून या जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

उमेदवारांना त्यांचे अर्ज www.wr.indianrailways.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. पात्र उमेदवारांना खालील सूचनांचे पालन करून मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली जाते. ०४ डिसेंबर २०२३ रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पदभरतीचा तपशील :

एकूण रिक्त जागा : ५

मेडिसिन जीडीएमओ-सीएमपी (Medicine GDMO-CMP) : १ जागा
रेडिओलॉजी सीएमपी-स्पेशालिस्ट (Radiology CMP-Specialist) : १ जागा
ऑर्थोपेडिक सीएमपी-स्पेशलिस्ट (Orthopedic CMP-Specialist) : १ जागा
डेंटल सीएमपी-जीडीएमओ (Dental CMP-GDMO) : १ जागा
अर्धवेळ डेंटल सर्जन (Part Time dental Surgeon) : १ जागा

नोकरी ठिकाण : मुंबई

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

मेडिसिन जीडीएमओ-सीएमपी : MBBS (MCI मान्यताप्राप्त) उमेदवारांनी MCI/MMCT मध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

रेडिओलॉजी सीएमपी-स्पेशालिस्ट : एमबीबीएस आणि पीजी डिग्री / संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा. (पदवी MCI मान्यताप्राप्त असावी) उमेदवार MCI/MMC मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

ऑर्थोपेडिक सीएमपी-स्पेशलिस्ट : एमबीबीएस आणि पीजी डिग्री / संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा. (पदवी MCI मान्यताप्राप्त असावी) उमेदवार MCI/MMC मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

डेंटल सीएमपी-जीडीएमओ : BDS (DCI) मान्यताप्राप्त उमेदवारांनी आजपर्यंत DCI मध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

अर्धवेळ डेंटल सर्जन : BDS (DCI) मान्यताप्राप्त उमेदवारांनी DCI/MDS वर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

मुलाखतीचे ठिकाण :
७ वा मजला, संलग्नक इमारत, जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८.

महत्त्वाच्या लिंक्स :

पदभरतीची मूळ जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे Click करा.

Source link

indian railway hospitalwestern railway bharti 2023western railway hospital jobsWestern Railway Recruitment 2023पश्चिम रेल्वे जगजीवनराम हॉस्पिटल मुंबई भरती २०२३
Comments (0)
Add Comment