सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा ७ एप्रिलला

Savitribai Phule Pune University News : महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) ७ एप्रिलला होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे.

सेटची ही ३९ वी परीक्षा असून पारंपारिक पद्धतीने (ऑफलाइन) होणारी ही शेवटची परीक्षा असणार आहे. यानंतरची ४० वी सेट परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येईल. पुणे विद्यापीठाकडून १९९५ पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते. ही परिक्षा ३२ विषयांसाठी घेण्यात येते. यंदा १७ शहरांमधील जवळपास २६२ परीक्षा केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात येणार आहे. कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण (राखीव ५० टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठीच्या अर्जाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ती जाहीर होणार असल्याचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे आणि सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी सांगितले. शेवटची सेट परीक्षा याच वर्षी २३ मार्चला झाली होती. या परीक्षेला जवळपास एक लाख ३ हजार विद्यार्थी बसले होते, अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने देण्यात आली आहे.

(वाचा : ICMR NIV Recruitment 2023: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये भरती, १० डिसेंबरपर्यंत करता येणार अर्ज)

Source link

Pune JobsPune University ExamsPune University SET ExamSavitribai Phule Pune Universityset exam 2023university of puneपुणे विद्यापीठसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसेट २०२३
Comments (0)
Add Comment