या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०६ डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर १० डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद केंद्र भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
वीजतंत्री प्रशिक्षणार्थी – ६५ जागा
तारतंत्री प्रशिक्षणार्थी – ६५ जागा
संगणक चालक प्रशिक्षणार्थी – २० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १५० जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून ‘आयटीआय’ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(वाचा: CMM Court Recruitment 2023: मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालय, मुंबई येथे १०० हून अधिक पदांची भरती; आजच करा अर्ज)
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी पत्ता : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, सं.व. सु. मंडळ कार्यालय, धाराशिव/ उस्मानाबाद
अर्ज सुरू होण्याची तारीख : ०६ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२३
या भरतीकरिता अर्ज करण्याआधी उमेदवाराने शासनाच्या ‘अप्रेंटीसशिप इंडिया’ या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड’ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १० डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: BOB Recruitment 2023: ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये पदवीधरांसाठी भरती; आजच करा अर्ज)