औरंगाबाद जिल्हा न्यायालयामध्ये विविध पदांसाठी भरती; १८ डिसेंबरपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

District Court Aurangabad Recruitment : महाराष्ट्रातील औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक-श्रेणी ३ (Stenographer-Grade 3), कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) व शिपाई (Peon / Hamal) पदासाठी एकूण १६८ रिक्त पदांसाठी भरतीच्या जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) जिल्हा न्यायालयामध्ये या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे.

सदर जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. पद भरतीचा तपशील पाहून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन ऑनलाइन पद्धतीने या जागांसाठी अर्ज करू शकणार आहेत.

पदभरतीचा तपशील :

  • लघुलेखक-श्रेणी ३ (Stenographer-Grade 3) : १६ जागा , ०४ जागा (Waiting List)
  • कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ७७ जागा, १९ जागा (Waiting List)
  • शिपाई (Peon / Hamal) : ४२ जागा, १० जागा (Waiting List)

मिळणार एवढा पगार :

लघुलेखक-श्रेणी ३ (Stenographer-Grade 3) : S-14 : ३८ हजार ६०० रुपये ते १ लाख २२ हजार ८०० रुपयांपर्यंत
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : S-6 : १९ हजार ९०० रुपये ते ६३ हजार २०० रुपयांपर्यंत
शिपाई (Peon / Hamal) : S-1 : १५ हजार रुपये ते ४७ हजार ६०० रुपयांपर्यंत

वरील भरतीसाठी १८ डिसेंबर २०२३ पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून याविषयीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज, अर्जाच्या शेवटच्या तारखेला सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे असून याविषयीचे सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये मिळेल.

Source link

Aurangabadaurangabad jobsdistrict court aurangabad recruitmentdistrict court recruitmentऔरंगाबाद जिल्हा न्यायालयात भरती
Comments (0)
Add Comment