‘या’ दिवशी होणार शासनाचा ‘नमो महारोजगार मेळावा’; जाणून घ्या सर्व तपशील

Namo Maharojgar Melava 2023 : महाराष्ट्रातील बेरोजगारांसाठी राज्य शासनाने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच नागपूर जिल्ह्यात शासनाचा ‘नमो महारोजगर मेळावा’ होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सध्या राज्यभरात राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पंडित दीनदयाळ रोजगार योजनेच्या (जागेवरच निवड) माध्यमातून हा रोजगार मेळावा घेतला जातो. त्याच माध्यमातून हा महा-मेळावा होणार आहे.

तरुणांच्या हाताला कामा मिळावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे. जिल्हया-जिल्ह्यातील कंपन्यांशी समन्वय साधून हा मेळावा आयोजित केला जात आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे. आता नागपूर जिल्ह्यात हा सर्वात मोठा रोजगार मेळावा होणार असून ज्यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील तरुण सहभागी होऊ शकतात.

या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो उमेदवारांना रोजगार दिला जाणार आहे. यामध्ये फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन या आणि अशा अनेक संवर्गातील विविध पदांचा समावेश आहे. तसेच अनेक नामवंत कंपन्या या मेळाव्यात रोजगार देण्यासाठी सहभागी होणार आहेत. हा मेळावा ०९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे होणार आहे.

(वाचा: Career Tips: करिअरमध्ये कामाचा कम्फर्ट झोन शोधताय? मग आजच त्यातून बाहेर पडा; ‘ही’ आहेत त्यामागील पाच कारणे)

रोजगार मेळाव्यातील काही महत्वाची पदे:
फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन आणि अनेक हजारो पदे

पद संख्या : १० हजारांहून अधिक.

शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी आणि अन्य अभ्यासक्रम.

रोजगार मेळाव्याचे ठिकाण : जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर

रोजगार मेळाव्याची तारीख : ०९ आणि १० डिसेंबर २०२३

इच्छुक उमेदवारांनी mahaswayam.gov.in या लिंक वर नोंदणी करायची आहे. या नोंदणी नंतर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे.

तसेच https://rojgar.mahaswayam.gov.in/ या लिंकवर क्लिक करून होम पेज वरील अहमदनगर जिल्ह्याच्या पर्यायावर क्लिक करावे. तिथे भरतीचे आणि पदांचे सर्व तपशील प्राप्त होतील.

(वाचा: HBCSE Recruitment 2023: होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई येथे विविध पदांची भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड)

Source link

job fair 2023Namo Maharojgar Melava 2023recruitmentrojgar melava 2023नमो महारोजगार मेळावाशासन आपल्या दारी कार्यक्रम
Comments (0)
Add Comment