कॅट २०२३ Objection form and Response sheet ऑनलाइन उपलब्ध; ८ डिसेंबरपर्यंत करता येणार नोंदणी

CAT 2023 Response Sheet:: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) लखनऊने कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (CAT) 2023 चे प्रतिसाद पत्रक (Response Sheet of the Common Admission Test (CAT) 2023) प्रकाशित केले आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार iimcat.ac.in या वेबसाइटवर लॉग इन करून ते डाउनलोड करू शकतात.

“CAT 2023 साठी उपस्थित उमेदवारांसाठी आक्षेप फॉर्म आणि प्रतिसाद पत्रक (Objection form and Response sheet) ५ डिसेंबर २०२३ सकाळी ११ वाजल्यापासून ८ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत सुरू असणार आहेत. त्यामुळे उमेदवार विहित कालावधीत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन Objection form and Response sheet भरू शकतात.

२६ नोव्हेंबरला तीन ठिकाणी प्रवेश परीक्षा झाली. सदर परीक्षेत ६६ प्रश्न विचारले होते, त्यापैकी २४ व्हर्बल एबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन (VARC), २० प्रश्न डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रीझनिंग (DILR) आणि २२ क्वांटिटेटिव्ह एबिलिटी (QA) चे प्रश्न विचारण्यात आले होते.

CAT 2023 साठी एकूण ३.२८ लाख उमेदवारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २.८८ म्हणजेच ८८ टक्के उमेदवार उपस्थित होते. सदर चाचणीचा कालावधी १२० मिनिटे तर, पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी १६० मिनिटे होता.

CAT 2023 उत्तर की डाउनलोड करण्यासाठी Direct link

आयआयएम लखनऊने उमेदवारांकडून अभिप्रायही मागवला आहे. ज्यांना प्राथमिक आन्सर (Primary Answer Key) कीवर आक्षेप घ्यायचा आहे ते ८ डिसेंबरपर्यंत करू शकतात. उमेदवारांच्या आक्षेपांचे तज्ञांच्या पॅनेलद्वारे पुनरावलोकन केले जाईल आणि वैध आढळल्यास, सुधारित उत्तरे अंतिम की (Final Answer Key) वर प्रकाशित केली जाईल.

त्यानंतर, प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. CAT 2023 मध्ये पात्र ठरलेले उमेदवार नंतर त्यांच्या पसंतीच्या बी-स्कूलमध्ये (Business School) प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

(वाचा : CAT 2023 Interview Tips : ‘कॅट’ करा ‘क्रॅक’, मुलाखतीची फेरी लवकरच)

Source link

iimiim cat 2023iim lucknowiimcat.ac.inresponse sheetआयआयएमआयआयएम परीक्षाकॅट २०२३
Comments (0)
Add Comment