‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’मध्ये ३०० हून अधिक पदांची भरती; आजच करा अर्ज

Electronics Corporation Of India Limited Recruitment 2023: तुम्ही जर अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा शिक्षण पूर्ण केले असेल आणि अप्रेंटीस पदाच्या नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा/तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ ने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून १५ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी – २५० जागा
डिप्लोमा/तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – ११३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ३६३ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून पदानुसार संबधित फिल्ड मध्ये अभियांत्रिकी पदवीधार किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: Career Tips: करिअरमध्ये कामाचा कम्फर्ट झोन शोधताय? मग आजच त्यातून बाहेर पडा; ‘ही’ आहेत त्यामागील पाच कारणे)

स्टायपेंड: (मासिक)
पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी – ९ हजार
डिप्लोमा/तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – ८ हजार

नोकरी ठिकाण : हैदराबाद

वयोमर्यादा : कमाल वय २५ वर्षे आहे. यामध्ये राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख :
१५ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: SAIL Recruitment 2023: ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया’ मध्ये विविध पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

Source link

ECIL Bharti 2023ecil recruitment 2023Electronics Corporation Of India Limited jobsrecruitmentइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२३
Comments (0)
Add Comment