Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas 2023: भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन, अर्थात महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांनी समाजासाठी, दिन दलितांसाठी दिलेले योगदान देशच नाही, तर जगापुढे आदर्श ठरले आहे. केवळ अस्पृश्यता निवारण नाही तर महिला, बाल, शिक्षण, न्याय अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले आणि माणसाला माणूसपणाचा संदेश दिला.
तळागाळातील समाजासाठी त्यांनी केलेले कार्य हे तर शब्दांच्याही पलीकडचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे ०६ डिसेंबर १९५६ रोजी निर्वाण झाले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला प्रचंड मोठा जनसागर देशभरातून लोटला. त्यांच्या कार्याप्रमाणेच त्यांचे जाणेही महापरिनिर्वाण झाले, म्हणून आजचा दिवस हा महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभरात मानला जातो.
तळागाळातील समाजासाठी त्यांनी केलेले कार्य हे तर शब्दांच्याही पलीकडचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे ०६ डिसेंबर १९५६ रोजी निर्वाण झाले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनाला प्रचंड मोठा जनसागर देशभरातून लोटला. त्यांच्या कार्याप्रमाणेच त्यांचे जाणेही महापरिनिर्वाण झाले, म्हणून आजचा दिवस हा महापरिनिर्वाण दिन म्हणून जगभरात मानला जातो.
बाबासाहेबांना लहानपणी शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. पण तरीही समाजाशी संघर्ष करून ते शिकले केवळ शिकलेच नाही तर परदेशातही आपल्या शिक्षणाने सगळ्यांना अचंबित केले. अर्थशास्त्र असो की न्यायशास्त्र, बाबासाहेबांनी प्रत्येक विषयत रुचि घेत अफाट शिक्षण घेतले. विशेष म्हणजे स्वतःच शिकून ते पुढे गेले नाही तर आपल्या भारतातल्या प्रत्येक पददलित, माता-भगिनी यांना शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
आज ते होते म्हणून आपल्याला सहज शिक्षण मिळणे सोपे झाले आहे. त्यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा घोष आजही आपल्याला प्रेरणा देतो. तेव्हा सकल समाजासाठी अविरत झटणार्या, समतेचा नारा देणार्या आणि तळागाळातील प्रत्येका माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार्या या महामानवाचे शिक्षण क्षेत्रातील योगदान काय हे आज जाणून घेऊया.
- बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षणतज्ज्ञ होते, एवढचे नव्हे तर ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’, ‘दलित वर्ग शिक्षण संस्था’, ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ अशा विधायक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रचार केला.
- शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा प्राप्त करवून दिला. तसेच शिक्षणविषयक तरतुदींना घटनात्मक संरक्षण प्राप्त करून दिले. जेणेकरून जेणेकरून शिक्षणाची चौकट अधिकच बळकट झाली.
- शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण होय, असे त्यांचे मत होते. म्हणूनच शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ हा संदेश त्यांनी समाजाला दिला. ज्यामुळे खर्या अर्थाने तळागाळात शिक्षणाची ज्योत पेटली आणि मोठ्या प्रमाणात लोक शिक्षणाकडे वळले.
- शिक्षण हे सर्वांना सोयीचे आणि सोपे व्हावे, कुणीही त्यापासून वंचित राहू नये म्हणून बाबासाहेबांनी अनेक वाचनालये, समाजकेंद्रे, अभ्यासमंडळे यांची सुरुवात केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांच्या सोयी करत शिक्षणासोबत निवसाचीही व्यवस्था केली. सभा, मिळावे, बैठका यातून त्यांनी शिक्षणासाठी मोठी जनजागृती केली.
- शिक्षण माणसाला जगण्याचे, लढण्याचे सामर्थ्य देते, शिक्षण माणसाला विचार करायला शिकवते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला प्राधान्य दिले. घटनेच्या ४५व्या कलमान्वये वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनव्यवस्थेची असल्याची तरतूद त्यांनी केली, ज्यामुळे आज गावकुसापर्यंत शिक्षण पोहोचले.
- शिक्षणात धार्मिक प्राबल्य निर्माण होऊ नये, समाजात विषमता वाढू नये म्हणून सरकारच्या पैशातून चालविल्या जाणार्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, असा नियम बाबासाहेब आंबेडकर यांनी केला.
- देशातील मुलांना १४ वर्षे सक्तीचे व मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अनुसूचित जाती व जमाती व इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध संवर्धन करण्यासाठी विशेष योगदान दिले. तसेच अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शिक्षणसंस्था व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार दिला.
- अस्पृश्यता नष्ट करून मागासवर्गीयांचे शिक्षणाचे मार्ग खुले केले. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी विशेष तरतूद केली. केवळ शिक्षणच नाही नोकरी सेवा क्षेत्रातही मागासवर्गीयांसाठी नियुक्ती किंवा पदे राखून ठेवण्याची तरतूद केली.
- शिक्षणाने स्त्री-स्वातंत्र्याचा मार्ग प्रशस्त होईल याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे महिला कल्याण व स्वातंत्र्याला शिक्षणाने गती मिळते असे म्हणत केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांनी ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडले. मात्र, संसदेत ते विधेयक फेटाळले गेल्याने त्यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. स्त्रीयांचे शिक्षण, हक्क, अधिकार, सोयी, प्रसूती रजा, न्याय यामध्ये समानता यावी यासाठी बाबासाहेबांचे विशेष योगदान आहे.