कोकण रेल्वेमधील या भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय ०१ सप्टेंबर २०२३ रोजी कमीत कमी १८ तर जास्तीत-जास्त २५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये एससी / एसटी उमेदवारांना ०५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ०३ वर्षाची सूट देण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया पदवीधर अप्रेंटिस,जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस,टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस इत्यादी पदांवर होणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण कोकण रेल्वे कार्यक्षेत्र असून, यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ओबीसीसाठी १०० रुपये तर, एससी / एसटी / इडब्ल्यूएस / पीडब्ल्यूडी /अल्पसंख्यांक / महिला यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही.
ही भरती प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत होणार असून उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच पदानुसार अर्ज सादर करायचे आहेत.
यामध्ये शैक्षणिक पात्रता पदवीधर/टेक्निशियन/संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी पर्यंत असणे आवश्यक आहे, सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
पदभरतीचा तपशील :
संस्था : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत सरकार
भरले जाणारे पद :
- पदवीधर शिकाऊ (Graduate Apprentices)
- डिप्लोमा शिकाऊ (Diploma Apprentices)
पदनिहाय जागांचा तपशील :
पदवीधर अप्रेंटिस: ८० जागा
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : ३० जागा
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : ८० जागा
एकूण भरल्या जाणार्या जागांची संख्या : ११९
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदवीधर अप्रेंटिस : Engineering degree in relevant discipline
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : Diploma in Engineering in relevant discipline.
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : BA /B.Com/ B.Sc /BBA /BMS/Journalism & Mass Communication / Bachelor of Business Studies
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेनुसार अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.