चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती; ‘हे’ उमेदवार करू शकतात अर्ज

Government Medical College Chandrapur Recruitment 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या एकूण ०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
प्राध्यापक – ०४ जागा
सहयोगी प्राध्यापक – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार एमडी/ डीएनबी उत्तीर्ण असावा. यामध्ये विविध विषयातील प्राध्यापकांचा समावेश आहे. त्या-त्या पदासाठीची सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

(वाचा: Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023: नागपूर महानगरपालिकेत महाभरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)

वेतन: (मासिक)
प्राध्यापक – २ लाख रुपये
सहयोगी प्राध्यापक – १ लाख ८५ हजार रुपये

नोकरी ठिकाण : चंद्रपूर

वयोमर्यादा : कमाल ६९ वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘शासकीय वैद्यकीय रुग्णालय, चंद्रपूर’ यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १४ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Mahavitaran Recruitment 2023: ‘महावितरण’ मध्ये दहावी पास उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या सर्व नोकरीचे तपशील)

Source link

GMC Chandrapur Bharti 2023GMC Chandrapur Recruitment 2023Government Medical College Chandrapur recruitmentrecruitmentशासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती २०२३
Comments (0)
Add Comment