RRC उत्तर रेल्वेमध्ये ३०९३ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर, दहावी आणि ITI उत्तीर्ण करू शकणार अर्ज

RRC Northern Railway Bharti 2023 : रेल्वे रेक्रूटमेंट सेलने उत्तर रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवारासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण ३०९३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. सदर भरतीसाथी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व माहिती खालीदेण्यात आली आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Konkan Railway मध्ये भरती; विविध पदांच्या ११९ जागांवर डिप्लोमा आणि डिग्री धारक इंजिनिअर्सला काम करण्याची सुवर्णसंधी

या भरतीसाठी अर्ज अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जाऊन भरावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२३ आहे.

शैक्षणिक पात्रता:

मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेमधून दहावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील ITI पदवी.

वयोमर्यादा :

उमेदवारांचे किमान वय १५ वर्षांपेक्षा कमी आणि २४ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादा ११ नोव्हेंबर २०२३ रोजी मोजली जाईल.
रेल्वेच्या नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्काविषयी :

सामान्य, OBC, EWS : १०० रुपये
SC, ST, महिला उमेदवार : मोफत

निवड प्रक्रिया :
उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर निवडले जाईल. निवडलेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल.

महत्त्वाची कागदपत्रे:

  • १० वी गुणपत्रिका
  • बारावीची गुणपत्रिका
  • पदवी गुणपत्रिका
  • उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी
  • जात प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
  • आधार कार्ड

RRC Northern Railway भरतीसाठी याप्रमाणे अर्ज करा :

  • मुख्यपृष्ठावरील भरती (Recruitment) विभागावर क्लिक करा.
  • RRC NR शिकाऊ भरती 2023 (Apprenticeship Recruitment 23) वर क्लिक करा.
  • Apply Online वर क्लिक करा.
  • आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • तुमच्या श्रेणीनुसार फी भरा.
  • फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, शेवटी सबमिट करा.
  • फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि ठेवा.

महत्त्वाच्या लिंक्स :

RRC Northern Railway भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

RRC Northern Railway भरतीमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

RRC Northern Railway भरतीविषयी अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाइट rrcnr.org वर जा .

Source link

bharatiya railway jobsindian railwayindian railway jobsnews & recruitment info northern railwayrrcrrc northern railway recruitmentrrcnr.orgभारतीय रेल्वेरेल्वे भरतीरेल्वे रेक्रूटमेंट सेलने उत्तर रेल्वे
Comments (0)
Add Comment